आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेच्या टँकरने होणारा पाणीपुरवठा महागला !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- टँकरने पाणीपुरवठा करावयाच्या दरात महापालिका प्रशासनाने दुप्पट वाढ केली आहे. मनसेने या निर्णयामुळे प्रशासनाचा निषेध नोंदवला.
प्रशासनाने सुचवलेल्या दरवाढीला राष्ट्रवादीचे राजू मोरे, अश्विनी देशमु्ख, भाजपाचे सुनील माळी यांनी विरोध दर्शवला. मुलींच्या लग्नाला आधीच प्रचंड खर्च होतो. त्यात पाण्याचे दर वाढवून मुलीच्या वडिलांवर अन्याय करणार असल्याचे अश्विनी देशमुख यांनी म्हटले. त्यावर आयुक्त कापडणीस यांनी लग्नासाठी होणारा खर्च कमी करण्यासाठी सगळ्यांनी प्रय} करण्याची गरज आहे. अखेर सभापती नितीन लढ्ढा यांनी सुचवलेली वाढ जास्त असल्याने प्रति टँकर 400 रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला. बांधकाम, हॉटेल्स, लॉज व फॅक्टरीसाठी टँकरचे दर 400 वरून 1600 रुपये तर मनपाच्या विहिरीवरून खासगी टँकर भरण्यासाठी 50 रुपयांवरून 100 रुपये मोजावे लागतील. मनपा हद्दीत व बाहेर नवीन आग प्रतिबंधक लायसन्स देणे व नूतनीकरण करणे प्रेसिंग करिता प्रमाणपत्र देण्यासाठी 500 रुपयांऐवजी 2000 रुपये दर निश्चित करण्यात आले.