आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन विहिरींसह दाेन कूपनलिका पुनर्जीवित; पाणीटंचाई मिटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- रेल्वेप्रशासनाने अापल्या हद्दीत गेल्या महिनाभरापासून ४० टक्के पाणीकपात केली अाहे. मात्र, भविष्यात अधिक दुर्भिक्ष जाणवू नये, म्हणून गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेल्या तीन विहिरी दाेन कूपनलिका पुनर्जीवित करण्यात अाल्या अाहेत. त्यामुळे दाेन ते तीन हजार लाेकसंख्येच्या पंधरा बंगला भागात दरराेज दीड लाख लिटर पाणीपुरवठा हाेत अाहे.

पालिकेतर्फे शहरात तीन दिवसांअाड तर रेल्वे हद्दीत एक दिवसाअाड पाणीपुरवठा हाेत अाहे. रेल्वे हद्दीत ४० टक्के पाणीकपात करण्यात अाली अाहे. अागामी काळात ही टक्केवारी वाढली, तर रेल्वे वसाहतीसह अाजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. ही शक्यता गृहित धरून रेल्वे प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियाेजन केले अाहे.
टंचाईवरमात करण्याचा प्रयत्न : रेल्वेहद्दीतील पहेलवानबाबा जलकुंभ, इलेक्ट्रिक सबस्टेशन, अायअाेडब्ल्यू कार्यालय परिसर येथील तीन विहिरी हनुमान मंदिर, पंधरा भागातील दाेन कूपनलिका पाच वर्षांपासून बंद हाेत्या. सर्वेक्षण करून येथून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनीची पाहणी करण्यात अाली. त्यानंतर पाण्याची रासायनिक तपासणी करून पाचही ठिकाणी सबमर्सिबल पंप टाकून पाणीपुरवठा सुरू करण्यात अाला. या कामासाठी दीड लाख रुपये खर्च करण्यात अाला अाहे.

अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती : रेल्वेप्रशासनाने अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, रेल्वे यार्डात विविध विभागांची प्रशासकीय कार्यालये, रेल्वेस्थानकावरील फलाटावर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती अभियानही हाती घेतले अाहे. निवासस्थाने कार्यालयांच्या अावारात अावश्यकता नसेल असे नळकनेक्शनही बंद केले अाहेत. जलवाहिनीला गळती लागली असेल तर ती अवघ्या काही तासांतच दुरुस्त करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात अाल्या अाहेत. वेळाेवेळी टंचाईचा अाढावा वरिष्ठांकडून घेतला जाताे.

बंधाऱ्यात पाच दिवसांचा साठा : रेल्वेहद्दीत तापी नदीपात्रातील अपर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जाताे. त्यात सध्या पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा अाहे. हतनूर धरणाचे अावर्तन येत्या पाच ते सहा दिवसांनी मिळण्याचे संकेत अाहेत. तत्पूर्वी प्रशासनाने या बंधाऱ्याची उंची ७५ सेंटिमीटरने वाढवण्याचे काम हाती घेतले अाहे. येत्या पंधरवड्यात हे काम पूर्ण हाेण्याचे संकेत अाहेत. बंधाऱ्यातील पाणीसाठा सध्या २० ते २२ दिवस पुरताे. मात्र, उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले, तर हाच साठा ३० ते ३२ दिवस पुरेल.
काम पूर्ण झाल्यानंतर साठा ३० दिवस पुरणार
भुसावळ | शहरातीलतापी नदीपात्रातील निम्न बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी पालिकेने त्याची उंची दीड फुटांनी वाढवण्याचे काम शनिवारपासून सुरू केले अाहे. सध्या या बंधाऱ्यातील साठा २० दिवस पुरताे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर हा साठा ३० दिवस पुरणार अाहे.

बंधाऱ्याची उंची वाढवावी, म्हणून ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. २३ मार्च रोजी यासंदर्भात पालिकेने तातडीने विशेष सभा घेऊन या संदर्भात ठराव केला. त्यानंतर नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, पाणीपुरवठा सभापती जरिनाबी नसीमखान यांनी पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळवून नियोजन केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे या कामाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानुसार ११ लाख हजार २९९ रुपये काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाल्याने ते सुरू करण्यात अाले अाहे. तापी नदीपात्रातील सध्याचा साठा ४० टक्के कपात, तीन दिवसांआड पाणीपुरवठा करूनही २२ ते २३ दिवस पुरवता येतो. बंधाऱ्याची ५९० फूट लांबीपर्यंत, दीड फूट उंची वाढवल्यानंतर हा साठा ३० ते ३१ दिवस टिकवता येणार अाहे.