आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावकरांना नाही पाणीकपातीची चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यंदा पाऊस लांबल्याने पुणे, मुंबईसारख्या महानगरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावू लागले आहे. राज्यभरात अशी स्थिती अनेक शहरांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, जळगाव शहरानजिकच्या वाघूर धरणात समाधानकारक जलसाठा आहे. त्यामुळे पाऊस लांबला तरी जळगावकरांना पाणीकपातीची चिंता नाही. सध्या सुरू असलेल्या रोटेशनप्रमाणे पाणीपुरवठा सुरू ठेवला तरी वर्षभर पाणी सहज पुरेल.
जळगाव शहरासह नेरीलगतच्या सात गावांची तहान भागवणार्‍या वाघूर धरणात अजूनही 70 टक्के जलसाठा शिल्लक आहे. राज्यात पाऊस लांबल्याने पुणे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये पाणीपुरवठय़ात कपातीसंदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे. जळगावकरांना मात्र वाघूरमुळे पाण्याबाबत ‘अच्छे दिन’ आले आहेत. पुरेसा साठा असल्याने प्रशासन किंवा पदाधिकार्‍यांनीही पाणी कपातीसंदर्भात यंदा विचारही केलेला नाही. यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही तरीदेखील पुढील जूनपर्यंत आहे त्या पद्धतीने जळगावकरांना पाणीपुरवठा करता येईल, एवढा जलसाठा वाघूरमध्ये आहे. उलट हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार समाधानकारक पाऊस जरी झाला तरीही धरण ओव्हर फ्लोची तयारी पाटबंधारे विभागाने ठेवली आहे. प्रत्यक्षात तसे झाल्यास पहिल्यांदाच खालचे गेट उघडले जाऊन अनेक वर्षांपासून तळाला साचलेली घाणही बाहेर पडणे शक्य होईल.
पाण्याची पातळी
2 दिवसाआड पाणीपुरवठा
15 नोव्हेंबर 2012 पासून जळगाव शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे ठरले होते. गेल्यावर्षी जलसाठा अत्यंत कमी झाल्याने 14 जून 2013 पासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली होती. मात्र 15 जून 2013 रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर पाणी कपातीचे संकट टळले होते. तेव्हापासून गेल्या वर्षभरात पाणीपुरवठा दोन दिवसाआडच सुरू आहे.