आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता तीन दिवसाआड पाणी; 'डाऊन स्कीम’नंतरही जळगावात पाण्यासाठी कसरत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाघूर धरणावरील ‘डाऊन स्कीम’मुळे जळगावकरांची पाण्याची चिंता मिटणार, असा पदाधिकार्‍यांनी दावा केला होता. प्रत्यक्षात ही योजना शहराला पाणीपुरवठा करण्यात सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरात दोन ऐवजी तीन दिवसाआड (चार दिवसांनी) पाणीपुरवठा होणार आहे. शहराला पुरेसे पाणी देण्यासाठी ही योजना सक्षम नसल्याचे ‘दिव्य मराठी’नेच अभ्यासाअंती स्पष्ट करीत 20 मे रोजी तीन दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे भाकीत केले होते. त्याला बुधवारी पुष्टी मिळाली आहे. ही योजना शुक्रवारपासून कार्यान्वित होणार आहे.

वाघूर धरणाची जलपातळी 220.450 मीटरपर्यंत आली आहे. ही पातळी 220.200 मीटर आल्यावर ‘अप स्कीम’मधून पाणी मिळणे बंद होणार आहे. ऐनवेळी अडचण होण्यापूर्वीच शुक्रवारपासून ‘डाऊन स्कीम’चा वापर सुरू करण्यात येणार आहे. ‘डाऊन स्कीम’ योजना सुरू झाल्यानंतरही जळगावकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याचे भाकीत ‘दिव्य मराठी’ने वर्तविले होते. एमआयडीसीकडून सध्या सात एमएलडी पाणी मिळत असून, त्याऐवजी 15 एमएलडीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी त्याला अद्याप यश आलेले नाही.

पाण्याचे गणित जुळेना

‘डाऊन स्कीम’वर 90 अश्वशक्तीच्या पंपातून प्रतितास 28 लाख लिटर पाणी उपसा करण्याची क्षमता आहे. 22 तास सर्व पंप सुरू राहिले तरी 616 लाख लिटर पाणी उचल करणे शक्य आहे. मात्र, धरणाजवळील पंपिंग स्टेशनमधून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी दोन पंप सुरू ठेवावे लागणार असून त्यांची क्षमता 26 लाख लिटर आहे. दोन दिवसाआड पुरवठा करण्यासाठी सध्या 60 एमएलडी पाणी लागत होते. शुक्रवारपासून 32 ते 35 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.


‘; ‘दिव्य मराठी’ने वर्तविलेले भाकीत ठरले खरे; शहरात शुक्रवारपासून कार्यान्वित होणार योजना

तीन दिवसांआड असा होईल पाणीपुरवठा
शुक्रवार : नटराज टाकी परिसर, शनिपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ हौसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, चौघुले मळा, खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, केसी पार्क, गेंदालाल मिल हुडको, भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबाँड कॉलनी, जुने जळगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, ऑफिसर क्लब टाकी परिसर, मेहरूण गावठाण.

शनिवार : वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर, सुप्रीम कॉलनी, खेडी गाव, योगेश्वरनगर, हिरा पाइप परिसर.

रविवार : भागवतनगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिव कॉलनी परिसर, गणेश कॉलनी, र्शीकृष्ण कॉलनी, मोहननगर, नेहरूनगर, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ परिसर, मेहरूण परिसर पहिला दिवस, रामेश्वर कॉलनी, एमडीएस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर, अयोध्यानगर, शांतिनिकेतन, गुरुकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनर्शीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व परिसर.

सोमवार : पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बॅँक कॉलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभुजानगर, वाटिकार्शम, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, मेहरूणमधील दत्तनगर, लक्ष्मीनगर, इक्बाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर, साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, तांबापुरा, श्यामा फायर परिसर, अयोध्यानगरातील ऑटोनगर, लक्ष्मी पार्क, सद्गुरूनगर, पोल फॅक्टरीमागील भाग, हनुमाननगर.