आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्यात झाले ४५८ पाणी टँकर, बंद संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १७ टँकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात टँकरची संख्या कमालीची घटत आहे. दीड महिन्यात तब्बल ४५८ टँकर बंद झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यात तब्बल ५२१ पाणी टँकर सुरू होते. सोमवार अखेरपर्यंत ही संख्या ६३ वर आली आहे. दरम्यान, परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे सोमवार अखेरपर्यंत जिल्ह्यात रब्बीच्या ६७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने डिसेंबरपासूनच जिल्ह्यात पाणी टँकरला मागणी सुरू झाली होती. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मे महिन्यात जिल्ह्यातील टँकरची संख्या ४७५ वर गेली होती. मात्र, जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. ते १५ जूनपर्यंत चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. तब्बल तीन महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यात टँकरची मागणी वाढू लागली होती. पाथर्डी, पारनेर, जामखेड, कर्जत, नगर, शेवगाव या तालुक्यांत प्रशासनाने मोठ्या संख्येने टँकर सुरू केले होते. सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात आठ लाख नागरिकांना तब्बल ५२१ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. पाथर्डी तालुक्यात टँकरने शंभरी आेलांडली होती. त्या खालोखाल पारनेर तालुक्यात ८० हून अधिक टँकर सुरू होते. त्यानंतर सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे कूपनलिका, विहिरी, तलाव, पाझर तलावामध्ये पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे टँकरची संख्या कमी होऊ लागली. दोन आठवड्यांपूर्वी ३८४ टँकर प्रशासनाने बंद केले.

सध्या केवळ ६३ टँकर सुरू आहेत. सध्या सर्वाधिक पाणी टँकर बागायती भाग असलेल्या संगमनेर तालुक्यात सुरू आहेत. या तालुक्यातील गावे १० वाड्या-वस्त्यांवरील तब्बल २९ हजार ४५९ नागरिकांना १७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाथर्डी पारनेर तालुक्यात प्रत्येकी टँकर सुरू आहेत. दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यातील ३५० गावे १४३७ गावांमधील लाख नागरिकांना तब्बल ५२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या पिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून, जिल्ह्याच्या सर्वच भागात रब्बीच्या समाधानकारक पेरण्या झालेल्या आहेत.आतापर्यंत रब्बीच्या ६७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

चार तालुके टँकरमुक्त
दोनमहिन्यांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील अकोले, श्रीरामपूर, राहुरी राहाता हे तालुके टँकरमुक्त झाले आहेत.

ज्वारीची लाख हेक्टरवर पेरणी
जिल्ह्यातपरतीच्या पावसामुळे रब्बीच्या क्षेत्र लाख हेक्टर क्षेत्राने वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ज्वारीची लाख हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सरासरीच्या क्षेत्राच्या तुलनेत यंदा ज्वारीची पेरणी झालेली आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र हे लाख १९ हजार हेक्टर आहे. मकाच्या हजार ९३९ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हरभरा १५ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. करडईची हजार ४७९ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
पुढिल स्लाइड्सवर पाहा, तालुक्यांचे हाला