आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळसाठी १२.३१ दलघमी साठा हतनूरमध्ये संरक्षित; नियोजन पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - आगामी आठवडाभरात हतनूरमध्ये १०० टक्के जलसाठा होणार आहे. यामुळे हतनूरवर अवलंबून असलेल्या ३७ पाणी वापर संस्थांना आगामी उन्हाळ्यात मुबलक पाणीपुरवठा होईल. यासह भुसावळ शहरासाठी १२.३१ दलघमी, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठी ३४.०५, तर मध्य रेल्वेसाठी ७.३० दलघमी पाण्याचा साठा संरक्षित केला जाणार आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यातील टंचाईवर मात करता येणार आहे.
गेल्या पावसाळ्यात हतनूर धरण १०० टक्के भरले होते. मात्र, उन्हाळ्यातील प्रचंड उष्म्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले. यामुळे हतनूरवर अवलंबून असलेली गावे आणि शहरांना पाणीटंचाईच्या झळा बसल्या. सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा भुसावळ शहराला सहन कराव्या लागल्या. हतनूरमधून आवर्तन मिळाल्याने उन्हाळ्यात सलग दोन वेळा आठ ते दहा दिवस शहरातील पाणीपुरवठा ठप्प होता. यंदाही हतनूर धरणात येत्या आठवड्यात १०० टक्के जलसाठा होईल. यानंतरच्या काळात हतनूरवर अवलंबून असलेल्या ३७ पाणी वापर संस्थांद्वारे तब्बल १८० गावे, शहर आणि प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी साठा संरक्षित केला जाणार आहे. हतनूर धरणाच्या अप्पर लोअर डॅमवरून काही भागांना कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यात लोअर डॅममध्ये दीपनगर केंद्र, मध्य रेल्वे (भुसावळ), आरपीडी, एमआयडीसी (जळगाव), भुसावळ, यावल, धरणगाव, अमळनेर आदी पालिकांना पुरवठा होतो, तर अप्पर डॅममधून वरणगाव आयुध निर्माणी, मलकापूर एमआयडीसी, सावदा, रावेर मलकापूर पालिका, बोदवड तळवेल गटातील ८१ गावांची पाणीपुरवठा योजना आदी पाणी वापर संस्थांना पुरवठा केला जातो. यासाठी दरवर्षी संरक्षित जलसाठा केला जातो. पुढील महिन्यात याचे नियोजन पूर्ण केले जाणार आहे.

सुखद सोमवार
Á१०५.११ दलघमी आरक्षण : हतनूरधरणावर ३७ पाणी वापर संस्थांचे वार्षिक १०५.११ दलघमी अर्थात हजार ७१५.५७ दलघफू आरक्षण आहे. गेल्या वर्षाच्या आरक्षणानुसार पुरवठा करण्यात आला. यात सर्वाधिक जलसाठा दीपनगरसाठी ३४.०५ दलघमी आहे. यानंतर एमआयडीसी मलकापूर, जळगाव, भुसावळ अमळनेर पालिकेचे आरक्षण आहे.

Áआवक लांबल्याने फायदा :गेल्या पावसाळ्यात हतनूर १०० टक्के भरले. मात्र, पाऊस कमी असल्याने धरणात आवक वाढली नाही. मात्र, यंदा परतीचा पाऊस अधिक असल्याने धरणात जानेवारीअखेरपर्यंत आवक कायम राहणार आहे. यामुळे रब्बीसाठी आवर्तन देऊनही धरणात जानेवारी, फेब्रुवारीत १०० टक्के जलसाठा कायम राहील.

४० दिवसांचा साठा करता येईल
Ãशहरासाठी हतनूर धरणात साठा आरक्षित आहे. मात्र, बंधाऱ्याची उंची कायमस्वरूपी वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नाही. बंधाऱ्याची उंची वाढली तर हतनूरमधून विसर्ग करून पालिकेला ४०पेक्षा अधिक दिवसांचा साठा कायम ठेवता येईल. बंधाऱ्याची उंची कायमस्वरूपी वाढवण्याचा तांत्रिक प्रश्न सुटणे बिकट आहे. -अख्तर पिंजारी,नगराध्यक्ष, भुसावळ

संस्थेचे नाव संभाव्य साठा
भुसावळ पालिका १२.३१
दीपनगरकेंद्र टप्पा एक १५.०५
दीपनगनरकेंद्र टप्पा दोन १९.००
मध्यरेल्वे (भुसावळ) ७.३०
आयुधनिर्माणी वरणगाव ४.६४
सावदानगरपालिका १.४९
रावेरनगरपालिका १.५६
यावलनगरपालिका १.७६
बातम्या आणखी आहेत...