आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकसहभागातून अधिकाऱ्याने अडवले अर्ध्या वाघूरएवढे पाणी, वाद केले हद्दपार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाचाेऱ्यातील एका तरुण अधिकाऱ्याने छंद म्हणून हाती घेतलेल्या उपक्रमातून गेल्या तीन वर्षांत अर्धा वाघूर धरण भरेल एवढे पाणी (जवळपास १५० दलघमी)अडवले जाईल, असे काम उभे केले अाहे. लाेकसहभागातून काम करण्याचा या अधिकाऱ्याचा ‘पाचाेरा पॅटर्न’ खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील भावला अाहे.

प्रशासनात कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळताना प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी गेल्या तीन वर्षांत पाचाेरा, भडगाव अाणि पूर्वी चाळीसगाव तालुक्यात धरण व पाझर तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. शासनाने हाती घेतलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान मिसाळ यांच्या कामाला दिशा देणारे ठरले. ‘जलयुक्त शिवार’ अभियान अालेली संधी समजून मिसाळ नागरिक व लाेकप्रतिनिधींना साेबत घेऊन नाला खाेलीकरण करून त्यावर सिमेंट व मातीचे बांध बांधून पाणी अडवले अाहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी िमसाळ यांच्या कामांची पाहणी करून प्रशंसा केली अाहे.

फेसबुक पेजवर माहिती
- तरुणाईला मातीशी जाेडण्यासाठी ‘जलयुक्त शिवार-पाचाेरा’ या नावाने फेसबुक पेज तयार केले अाहे. त्यावर अालेल्या सूचना व तक्रारींची घेतली जाते दखल.
- जलसंधारणाच्या प्रत्येक कामाला दिली लाेकसहभागाची जाेड.
मातीत काम करण्याचा ध्यास
- शेत रस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी कार्यालयाएेवजी थेट बांधावर जाऊन साेडवल्या समस्या. त्यामुळे लाेकसहभाग वाढत गेला.
- ‘जलयुक्त शिवार’मधील कामांच्या ठिकाणी स्वत: हजर राहून केले काम. तसेच गुणवत्तेसाठी स्वत: केले माेजमाप.

‘जलयुक्त’चा पाचाेरा पॅटर्न राज्यात चर्चेत
प्रशासनात राहूनही अशासकीय कार्यपद्धतीचा अवलंब करत प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी तीन वर्षांत केलेल्या कामांमुळे पाचाेरा व भडगावमधील बहुतांश गावांचे शिवार ‘जलयुक्त’ झाले अाहेत. त्यांच्या कामांचा ‘पाचाेरा पॅटर्न’ चर्चेत अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...