आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Management Committee Meeting February 3 Deadline To Complete The Record

जलव्यवस्थापन समितीची सभा-रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी 3 फेब्रुवारीची डेडलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वर्गखोल्यांचे हस्तांतरणही झाले आहे. मात्र, एमबी रेकॉर्ड पूर्ण न केल्यामुळे बांधकामाच्या रकमेतील पाच टक्के देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. असे 1046 प्रस्ताव प्रलंबित असून ते पूर्ण करण्यासाठी 3 फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे.

शिक्षण समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. त्यावर दिलेल्या मुदतीतही कार्यवाहीस विलंब करणार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची सूचना सभापती रक्षा खडसे यांनी दिली. 2009-10 मध्ये 193 पैकी 25, 2010-11 मध्ये 378 पैकी 299, 2011-12 मध्ये 429 पैकी 300 आणि 2012-13 मध्ये 300 पैकी 300 वर्ग खोल्यांच्या बांधकामाची पाच टक्के रक्कम एमबी रेकॉर्ड पूर्ण न केल्यामुळे प्रलंबित आहे, अशी संबंधितांकडून देण्यात आली. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हापरिषदेच्या शाळांचे मूल्यांकन करून र्शेणी निश्चिती पडताळणीचे काम जिल्हाभर सुरू झाले आहे. तालुका व जिल्हास्तरीय पथकाकडून तपासणी करताना संपूर्ण निकषांची पडताळणी करूनच शाळांची निश्चिती करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. जिल्ह्यातील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी नऊ लाखांच्या निधीचा प्रस्ताव येत्या आर्थिक वर्षात करण्याची मागणी करण्यात आली.

समाधान पाटील यांनी जामनेर तालुक्यातील काही शिक्षकांना पीएफची रकमेची प्रत्येकाच्या खात्यावर नोंद करताना चुका होत असल्याची तक्रार केली. शाळांना आकस्मिक भेट देण्याच्या सूचना या वेळी सभापतींनी केली.

पाच लाखांवरील कामांचे विषय आयत्यावेळच्या विषयात न घेता ते नियमित विषय म्हणून अजेंड्यावर घेण्यात यावे. यापुढे असा एकही विषय आयत्यावेळी न घेण्याचा निर्णय जलव्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यापूर्वीच आयत्यावेळच्या विषयांचे धोरण ठरवण्यात आले होते. मात्र, वारंवार पाच लाखांवरील खर्चाचे विषय आयत्यावेळी ठेवण्याचे प्रकार सुरूच आहे. त्यामुळे या बैठकीत ठेवलेले आयत्यावेळचे पाच विषय नामंजूर करण्यात आले. यापुढे असे विषय न ठेवण्याची ताकीद विभागप्रमुखांना दिली. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील पाणीपुरवठा दुरुस्तीच्या तीन लाख 53 हजार 068 च्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच अन्य तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामास या वेळी मंजुरी मिळाली. उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, रक्षा खडसे, कांताबाई मराठे, लीला सोनवणे, इंदिरा पाटील, रमेश पाटील, रुपाली चोपडे, डॉ. उद्धव पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, ए.ओ. निकम आदी सदस्य या वेळी उपस्थित होते.

पाझर तलाव दुरुस्तीस मंजुरी

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) 4 लाख 43 हजार 703 रुपये, काकोडा ता. मुक्ताईनगर 4 लाख 89 हजार 506 रुपये, मानेगाव ता. मुक्ताईनगर येथे 4 लाख 86 हजार रुपये, रूईखेडा ता. मुक्ताईनगर 4 लाख 83 हजार 593 रुपये, सोनाळा ता. जामनेर गावतलाव दुरुस्तीसाठी 3 लाख 97 हजार 213 रुपये मंजूर करण्यात आले.