आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Pipe Line Maintenance Complete After 32 Hours In Jalgaon

३२ तासांच्या प्रयत्नांनंतर जळगाव शहरात पाणीपुरवठा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाघूर जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने जळगावकरांना शनिवारी अडचणींचा सामना करावा लागला. ३२ तासांच्या प्रयत्नांनंतर रविवारी दुपारी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात अाले. ३.३० वाजेनंतर शहरात पाणीपुरवठा करण्यात अाला. पुरवठ्याचे वेळापत्रक काेलमडल्याने बऱ्याच भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा करण्यात अाला.

मेहरूण स्मशानभूमीजवळ शनिवारी सकाळी १२०० मिमी जलवाहिनी फुटली हाेती. त्यामुळे शहरात हाेणारा पाणीपुरवठा हाेऊ शकला नव्हता. संपूर्ण दिवसभर पाणी अाल्याने गृहिणींची चांगलीच धावपळ उडाली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शनिवारी सकाळी वाजेपासून सुरू केलेली दुरुस्ती रविवारी दुपारी पूर्ण झाली. यात पाच मीटरचा सिमेंटचा पाइप काढून त्या जागेवर नवीन लाेखंडी पाइपचा तुकडा टाकण्यात अाला. त्याला वेल्डिंग करून दुपारी ट्रायलदेखील घेण्यात अाली.
दुपारी अयाेध्यानगरात पाणीपुरवठा केल्यानंतर सायंकाळी शहरातील अन्य भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात अाला. दाेन वर्षांपूर्वीदेखील याच भागात जलवाहिनी फुटली हाेती. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी जाहीर केलेल्या नियाेजनानुसार पाणीपुरवठा हाेणार असल्याचे सांगितले.

रविवारी दुपारी३.३० वाजता दुरुस्ती पूर्ण
शनिवारी सकाळी 9 वाजता दुरुस्तीचे काम सुरू
१२०० मि.मी.वाघूरची जलवाहिनी
फोटो - सिमेंटच्या पाइपला लाेखंडी पाइप जाेडल्यानंतर वेल्डिंग करताना कर्मचारी.