आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Pipe Line Repaering Work Compelete In Jalgaon

जलवाहिनी दुरुस्तीचे काम 27 तासांत पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मेहरूण परिसरातील वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील तिसर्‍या मोठय़ा गळतीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी 27 तासांत पूर्ण झाले. त्यामुळे शुक्रवारपासून शहरात सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, तिसर्‍या गळतीच्या दुरुस्तीनंतर काही वेळ मिळाल्याने स्मशानभूमी परिसरातील गळतीची अंतर्गत दुरुस्तीही करून घेण्यात आली.

मेहरूण परिसरातून गेलेल्या वाघूरच्या 1 हजार 200 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील तिसर्‍या मोठय़ा गळती दुरुस्तीच्या कामाला बुधवारी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, स्मशानभूमीजवळील एका गळतीची दुरुस्तीही करण्यात आली. दुरुस्ती झाल्याने दुपारी 3 वाजेनंतर मुख्य जलवाहिनीवरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, शुक्रवारी शहरात सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.

या भागात येणार आज पाणी
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड व परिसर, मेहरूणमधील रामेश्वर कॉलनी, एमडीएस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर, अयोध्यानगर, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, मानराज पार्क, दांडेकरनगर, आसावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, शिवाजीनगर, हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, वाघनगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, योगेश्वरनगर, हिरा पाइप व खेडी परिसर.