आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरूणमध्ये जलवाहिनी फुटली; शहरात पुन्हा पाणीबाणीचे संकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण परिसरातील गळती दुरुस्तीचे काम लांबल्याने अाधीच तीन दिवस पाण्यासाठी मेटाकुटीस अालेल्या जळगावकरांसमाेर पुन्हा पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले अाहे. लक्ष्मीनगरातील दुरुस्तीचे काम पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत दुसऱ्याच दिवशी काही अंतरावर असलेल्या मेहरूणमधील बुरुजाजवळ मुख्य जलवाहिनीला भगदाड पडले अाहे. गुरुवारी पहाटे वाजेच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने रस्ते जलमय झाले हाेते. दरम्यान, दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलला अाहे. यात अाणखी वेळ लागल्यास पाण्याचे संकट कायम राहणार अाहे.
दीड वर्षात २५ पेक्षा जास्त वेळा जलवाहिनी फुटल्या अाहेत. त्यामुळे जळगावकरांना जलवाहिनी फुटण्याचे प्रकार नवीन नसले तरी क्लेशदायक ठरू लागले अाहेत. मेहरूण बुरुजाजवळील वाघूर पाणीपुरवठा याेजनेंतर्गत टाकण्यात अालेली १२०० मिमी व्यासाची पीएससी जलवाहिनी २८ राेजी पहाटे फुटली. मेहरूणच्या प्रवेशद्वाराजवळच माेठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला हाेता. जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांसाठी शुद्ध केलेले लाखाे लिटर पाणी नाल्यात वाहून जात हाेते. त्या वेळी सुमारे ४०० ते ५०० लाेकांचा जमाव जमला हाेता. जलवाहिनी दुरुस्तीचा कंत्राट देण्यात अाला अाहे. तरीही वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत अाहेत. तसेच नेहमीच मध्यरात्री अथवा पहाटे जलवाहिनी कशी काय फुटते? असाही प्रश्न उपस्थित केला जात अाहे. जलवाहिनी फुटीचा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावणारा ठरत असून याबाबत अाता वेगवेगळ्या बाजूने विचार करायला सुरुवात झाली अाहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
दाेन दिवसांपूर्वीच जलवाहिनी दुरुस्तीवर लाखाे रुपये खर्च केलेले असताना पुन्हा जलवाहिनी फुटल्याचे कळताच उपायुक्त प्रदीप जगताप, मुख्य लेखापरीक्षक एस. बी. भाेर यांच्यासह अधिकाऱ्यांनी मेहरूणमध्ये पाहणी केली. तसेच जलवाहिनी फुटण्याचेे काय कारण असू शकते? याची चाचपणी केली.

"अमृत'मधूनस्टील पाइपलाइन
काही वर्षांत एकाच भागात अधिक वेळा जलवाहिनी फुटली अाहे. त्यामुळे ‘अमृत’ याेजनेतून कस्तुरी हाॅटेल ते गिरणा टाकीपर्यंत स्टील पाइपलाइन (एम.एस.) टाकण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली. यात प्रेशर रिलीज व्हाॅल्व्हचाही समावेश राहणार अाहे. त्यामुळे शिवाजी उद्यान, कस्तुरी हाॅटेल तसेच गावठाणजवळ प्रस्तावित असलेल्या प्रेशर रिलीज व्हाॅल्व्हवर ८० लाख रुपये मनपाच्या तिजाेरीतून खर्च करणे साेईस्कर नसल्याचे सांगण्यात अाले.