आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेडीरोड परिसरात जलवाहिनी फुटली; तीन तासात केली दुरुस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील तीन मोठय़ा गळती दुरुस्तीचे काम आटोपून शुक्रवारी पुरवठा सुरू करताच खेडीरोड परिसरातील जलवाहिनी फुटली. या प्रकारामुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा झाला. नागरिकांनी तक्रार केल्यावर पुरवठा थांबविण्यात आला. दुरुस्तीचे काम झाल्यावर तीन तासांनंतर पुन्हा पुरवठा झाला.

मुख्य जलवाहिनीवरून होत असलेल्या गळत्यांची दुरुस्ती करण्यासाठी शहरातील पाणीपुरवठय़ाचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले होते. शुक्रवारी खेडीरोड परिसरात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. सकाळी 6 वाजता पुरवठा झाल्यावर नळांमधून माती मिर्शीत व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. यासंदर्भात पालिकेच्या पदाधिकार्‍यांना माहिती कळवताच गळतीचा शोध घेण्यात आला. रेणुका माता मंदिर परिसरात दोन इंच व्यासाची जलवाहिनी फुटल्याची बाब पालिका अधिकार्‍यांच्या लक्षात आली. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा थांबवण्यात येऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दोन तासात दुरुस्तीचे काम पूर्ण करून 10 वाजता या भागात पाणीपुरवठा करण्यात आला.