आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीनगरात पुन्हा एक पाइप फुटला, अाज उशिरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात लक्ष्मीनगरात जलवाहिनी दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू अाहे. त्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाल्याने शहरवासीयांना एेन हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत अाहे. तीन पाइप जाेडण्याचे काम सुरू असताना अचानक एक पाइप पुन्हा फुटल्यामुळे साेमवारी रात्री उशिरापर्यंत चार पाइप टाकण्याचे काम सुरू हाेते. मंगळवारी पहाटेपर्यंत काम पूर्ण हाेऊन टाक्या भरल्या तर उशिराने पाणी पुरवठा हाेण्याची शक्यता अाहे.
मेहरूणमधील लक्ष्मीनगरातील १२०० मीटरच्या मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात अाले हाेते. त्यामुळे प्रशासनाने एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलला हाेता. परंतु दुरुस्तीच्या कामात अनंत अडचणी येत असल्याने तसेच गळती शाेधण्यात २४ तासांपेक्षा जास्त वेळ गेल्याने पाणीपुरवठ्याचे संपूर्ण नियाेजन ढासळले. ज्या ठिकाणी एक पाइप बदलाचे नियाेजन हाेते तिथे तब्बल तीन पाइप बदलण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर अाली. हे काम साेमवारी रात्रीपर्यंत हाेण्याची शक्यता असताना अचानक पुन्हा एक पाइप फुटला. त्यामुळे तब्बल चार पाइप बदलण्याची गरज निर्माण झाली. पाणीपुरवठ्याबाबत अनभिज्ञ असलेल्या जळगावकरांची सोमवारी पहाटेपासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू झाली होती.

वेल्डिंगसाठी लागताेय वेळ
चारपाइपच्या वेल्डिंगसाठी दाेन वेल्डर्सवर जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. एक पाइप वेल्डिंग करण्यासाठी तास लागतात. रात्री १२ वाजेपर्यंत वेल्डिंगचे काम पूर्ण हाेण्याची शक्यता अाहे.

टाकी भरायला लागेल उशीर
जलशुद्धीकरणकेंद्रातून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यानंतर एक टाकी भरायला अडीच तास लागतात. त्यामुळे रात्री उशिरा दुरुस्ती पूर्ण झाली तरी पाण्याच्या टाक्या भरायला बराच वेळ लागेल. त्यामुळे मंगळवारी उशिरा कमी दाबाने पुरवठा होईल.

जारच्या विक्रीत वाढ
^गेल्या दोन दिवसात जारच्या विक्रीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. लग्नसराई नसल्याने अधिक फरक पडला नाही. मात्र, पाणीपुरवठ्याअभावी ही विक्री वाढली आहे. प्रवीण कुलकर्णी, वितरक

बोअरिंगचा आधार
सोमवारी पहाटेपासून शहरातील प्रत्येक कॉलनीत महिला, पुरुषांनी पाणी भरण्याची मोहीम हाती घेतली होती. ज्यांच्या घरी बोअरिंग आहे, त्यांनी परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले. काही कॉलन्यांमध्ये नागरिकांनी एकत्रितपणे पाण्याचे टँकर मागवून घेतले. तर पिण्यासाठी काहींनी फिल्टर पाण्याचे जारही मागवले होते.