आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा गळती; रोटेशन एक दिवस पुढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 1200 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली आहे.
मेहरूण परिसरात गुरुवारी दुरुस्ती के लेल्या जलवाहिनीच्या ठिकाणापासून काही अंतरावरच ही गळती असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासून मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा थांबवण्यात येऊन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी किमान 24 ते 28 तास लागण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी शहरातील काही भागात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. त्या भागात शनिवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तर शनिवारी ज्या भागात पाणीपुरवठय़ाचे रोटेशन होते ते एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे.
आज या भागात होणार नाही पाणीपुरवठा
खंडेरावनगर परिसर, पिंप्राळा गावठाण, हुडको, सेंट्रल बॅँक कॉलनी, आशाबाबानगर, मानराज पार्क परिसरातील शिंदेनगर, अष्टभुजानगर, वाटिकार्शम, खोटेनगर परिसरातील कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, मेहरूण परिसरातील दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर, अयोध्यानगर परिसर, हॅप्पी होम कॉलनी, लक्ष्मी पार्क, ऑटोनगर, र्शीनगर, पोल फॅक्टरी परिसर, साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, तांबापुरा, श्यामा फायरसमोरील परिसर, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिव कॉलनी परिसर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी.