आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्‍ये पिवळ्या पाण्याची धास्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात सुरू असलेल्या पिवळ्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले होते. या पाण्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. पालिकेतील प्रमुख अधिकार्‍यांना या विषयाकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. महापौर राखी सोनवणे यांनी शनिवारी तातडीची बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यावर आयुक्तांनी गळत्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या. या बैठकीनंतर आयुक्त कापडणीस यांनी वाघूर धरणाला भेट देत माहिती घेतली.
वाघूर धरणावरून शहरात तीन आठवड्यांपासून पिवळा आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. मात्र पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात एकही बैठक बोलवण्याची तसदी घेतली नव्हती. पालिकेच्या यंत्रणेकडून सुरुवातीला पिवळे पाणी येतच नसल्याचा दावा केला जात होता. मात्र, पिवळ्यारंगासह आता पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असल्याने शहरातील सर्वच भागातून तक्रारी वाढल्या आहेत. प्रशासन ठोस कारवाई करायला तयार नसल्याने अखेर महापौर राखी सोनवणे यांनी पुढाकार घेऊन शनिवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या बैठकीस उपमहापौर सुनील महाजन, पाणीपुरवठा विभाग प्रमुख डी.एस.खडके, केमिस्ट विजय यादव, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे अभियंते मंजूर खान, सुनील भोळे, सुहास चौधरी, समीर बोरोले यांच्यासह इतर अभियंते उपस्थित होते.