आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अयोध्यानगर परिसरात नाल्यांमध्ये रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याने रहिवाशांना बुधवारी प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. याची प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेतली असून एमआयडीसीतील कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. अधिकार्‍यांनी नाल्याच्या पाण्याचे नमुनेही घेतले आहेत. अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रदूषण नियंत्नण अधिकारी ए.जे.कुडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

म्हाडा कॉलनी व अयोध्यानगरातून वाहणारा नाला रहिवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागला आहे. या नाल्यातून वाहणार्‍या पाण्यात एमआयडीसीतील केमिकल, पेस्टीसाईड्स आदी कंपन्यांचे सांडपाणी सोडले जाते. यामुळे या नाल्याच्या पाण्याला रसायनाचा वास असतो. बुधवारी मात्र वायुगळतीचा तसेच तीव्र रसायनाचा वास या पाण्याला येत होता. यामुळे नागरिक हैराण झाले होते. याबाबत ‘दिव्य मराठी’ने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून वृत्त प्रकाशित केले होते. त्यांची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ए.जे.कुडे यांनी कंपन्यांचे सर्वेक्षण व पाण्याचे नमुने घेण्यासाठी फिल्ड ऑफिसर राजेश औटे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी अयोध्यानगर ते म्हाडा कॉलनी या भागातील नाल्याच्या पाण्याचे पाच नमुने तपासणीसाठी घेतले. तसेच कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तीन-चार दिवसात काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे.

नागरिकांनीही पुढे यावे : एमआयडीसीतील कंपन्यांचे सांडपाणी नाल्यातून वाहत जाते. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून यासंदर्भात काही माहिती असल्यास त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती देणे गरजेचे आहे.

दोषींवर कारवाई करणार
अयोध्यानगरातील नागरिकांना झालेल्या त्नासाची दखल घेत गुरुवारी अधिकार्‍यांना पाहणीसाठी रवाना केले आहे. पाण्याचे नमुने व कंपन्यांचा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर प्राप्त अहवालानुसार दोषींवर कारवाई केली जाईल. ए.जे.कुडे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी.