आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागेचे अारक्षण नसतानाही जलकुंभासाठी खोदले खड्डे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जागेचे काेणतेही अारक्षण झालेले नसताना जलसिंचन काॅलनीत जलकुंभ उभारला जात असल्याची धक्कादायक माहिती बाहेर अाली अाहे. केवळ शांतीनाथनगरातील नागरिकांनी विराेध केला म्हणून कुठल्याही परवानगी घेता थेट जलसिंचन काॅलनीतील माेकळी जागा निवडली गेली. त्यावर जलकुंभाचे काम सुरू झाले. मात्र, हीच जागा वर्षभरापूर्वी अामदार निधीतील १५ लाख रुपये खर्चून विकसित करण्यात अाली हाेती. संबंिधत याेजनेच्या ठेकेदाराने त्या जागेवर बुलडाेझर फिरवल्यामुळे अामदार निधीचा खर्चही वाया गेला अाहे.
शहरात नवीन पाणीपुरवठा याेजनेसाठी सध्या तीन ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येत अाहेत. मुळात या जलकुंभांची कामे बंद अाहेत. चक्करबर्डी येथील जलकुंभाचे काम काहीअंशी झाले अाहे. मात्र, साक्री राेडवरील जलसिंचन काॅलनीत असलेल्या जागेवर जलकुंभाच्या कामासाठी ठेकेदाराने तयारी सुरू केली अाहे; परंतु या जागेबाबत धक्कादायक माहिती पुढे येत अाहे. मुळात ही जागा जलकुंभाच्या उभारणीसाठी कधीच अारक्षित झालेली नव्हती. प्रशासनाने तसा काेणताही ठराव केलेला नाही. केवळ जागा माेकळी दिसली म्हणून त्या जागेवर जलकुंभ उभारला जात अाहे. मुळात या जलकुंभाचे काम शांतीनाथनगरात हाेणार हाेते. त्यासाठी जागेची पाहणीही झाली हाेती. मात्र, त्या परिसरातील नागरिकांनी विराेध केल्यामुळे काेणत्याही प्रकारे अारक्षण केले नसताना जलसिंचन काॅलनीत हा जलकुंभ उभारला जात अाहे. नागरिकांनी या बाबीला विराेध केला; परंतु अायुक्तांसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. जलकुंभासाठी काेणतेही अारक्षण नसताना महापालिकेने जलसिंचन काॅलनी परिसरातील नागरिकांची जागा हिरावून घेतली.

हायटेन्शन लाइन...
यापरिसरात उभारला जाणारा ७० ते ८० फुटांचा जलकुंभ भविष्यात धाेकादायक ठरू शकताे, असे नागरिकांचे मत अाहे. कारण या जागेवरून वीज मंडळाची हायटेन्शन लाइन गेलेली अाहे. त्याचबराेबर या माेकळ्या जागेत काेणतेही बांधकाम करू नये, असे न्यायालयाचे अादेश अाहेत. मात्र, या जागेवर माेठे खड्डे खाेदून तेथील गाैण खनिजही काढून नेण्यात येत अाहे.

नागरिकांचे श्रमदान...
जलसिंचनकाॅलनीत बेकायदेशीररीत्या उभारल्या जाणाऱ्या जलकुंभाची जागा वर्षभरापूर्वी अामदार निधीतील १५ लाखांच्या रकमेतून विकसित केली अाहे. त्यात वाॅल कंपाउंड, पेव्हिंग ब्लाॅक, वृक्षाराेपण, महिलांना सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमासाठी बांधलेल्या अाेट्याचा समावेश अाहे. याशिवाय स्थानिक नागरिकांनी वर्गणी गाेळा करून श्रमदान केले आहे.

गुन्हा दाखल करा...
^ठेकेदाराचेसाडेतीन काेटी रुपयांचे बिल काढण्यात अाले अाहे. यापूर्वी दिलेल्या रकमेसह जवळपास २५ काेटींची रक्कम अातापर्यंत ठेकेदाराने घेतली अाहे. त्यातच कामही थांबवले अाहे. मात्र, काम थांबवूनही त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे अायुक्तांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. नरेंदपरदेशी, नगरसेवक

जागेवर मनपाचा अधिकार...
शहरात विविध भागात असलेल्या माेकळ्या जागांवर महापालिकेची मालकी असते. त्या जागांचा वापर सार्वजनिक कारणासाठी करावा, असा उद्देश असताे. त्या ठिकाणी जनतेच्या साेईसाठी जलकुंभाची उभारणी हाेत असल्याने ना-हरकत दाखला घेण्याची गरज नाही. नियमानुसार त्या जागेचा वापर करता येताे. एस.बी.विसपुते,नगररचनाकार, महापालिका