आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधाऱ्यातील पाणीसाठा ४० दिवस पुरवा; पाटबंधारे विभागाची सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - तापी नदीपात्रातील बंधारा भरण्यासाठी हतनूर धरणातून १५ दिवसांअाड अावर्तन साेडावे, अशी मागणी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली अाहे. मात्र, त्यानुषंगाने सकारात्मक विचार करता पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यातील पाणीसाठा ४० ते ४५ दिवस पुरवावा, असा सल्ला पालिकेला दिला अाहे. अर्थात, अाता दुसरे अावर्तन मागणी करताच मिळाले नाही, तर तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामाेरे जाण्याशिवाय तरणाेपाय नाही. नगरपालिका पदाधिकारी अाता काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले अाहे.
तापी नदीपात्रात ब्रिटिशांच्या काळात बंधारा बांधलेला अाहे. पालिका सन १९५८पासून त्याचा वापर करीत अाहे. त्याची मालकी ही रेल्वे विभागाकडे अाहे. मात्र, ही बाब ज्ञात असतानाही यावल पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी भुसावळ पालिकेला पत्रव्यवहार करून २० ते २५ दिवसांनी अावर्तन मिळण्याची मागणी धुडकावली अाहे. उलटपक्षी बंधाऱ्यात ४५ दिवस पुरेल इतका साठा करण्याचा उपदेशही त्यांनी केला अाहे. तसेच करारनाम्यानुसार पालिकेने तीन महिन्यांचा पाणीसाठा करणे बंधनकारक अाहे. सद्य:स्थितीत मात्र, पालिकेकडून २० ते २५ दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची मागणी हाेत अाहे. त्यामुळे वहनव्यय जास्त हाेताे. दुष्काळी पार्श्वभूमीवर पाणीसाठा वाढवण्यासाठी उपाययाेजना करावी, बंधाऱ्यातून हाेणारा अनधिकृत पाणीवापर थांबवावा. अन्यथा, दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पत्र पाटबंधारे उपविभागाने १८ मार्च राेजी पालिकेला दिले अाहे. पालिकेला बंधाऱ्यात तीन महिन्यांचा साठा कराराप्रमाणे कसा करता येईल? असा प्रश्न कायम अाहे. त्यामुळे आगामी काळात शहरावर टंचाईची टांगती तलवार आता निर्माण झाली आहे. बंधाऱ्यातील पाणीसाठा दिवसागणिक कमी हाेत असल्याने हतनूरचे दुसरे अावर्तन जर ४० दिवसांनी मिळाले तर शहरात किमान १० दिवस ‘ड्राय डे’ पाळावा लागेल, अशी विचित्र परिस्थिती अाहे.

पालिका प्रशासन कोंडीत : पाटबंधारेविभागाने नगरपालिकेने केलेल्या मागणीला काेंडीत पकडणारे उत्तर दिल्याने शहरातील पाणीप्रश्नाचा गंुता वाढला अाहे. दरम्यान, शहरात तीन दिवसांअाड पाणीपुरवठा हाेत असला तरी येत्या दाेन ते तीन दिवसांत अाणखी ४० टक्के पाणीकपात हाेऊ शकते. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या हद्दीत पाणीकपात सुरू केली अाहेच; पण अपर बंधाऱ्याची उंची वाढवण्याच्या कामाला गतीही दिली अाहे. त्यांच्या बंधाऱ्याची उंची वाढली म्हणजे निम्न बंधाऱ्यात ठणठणाट हाेईल. परिणामी शहरवासियांना टंचाईला सामारे जावे लागेल.

सर्वपक्षीय पाठपुरावा
पाटबंधारे विभागाने जर पत्राप्रमाणे ४० ते ४५ दिवसांनी हतनूरचे अावर्तन साेडले तर येत्या पंधरवड्यात भीषण टंचाई निर्माण होईल. बंधाऱ्याची उंची वाढवण्याचा विषयही अाता तातडीने मार्गी लावण्याशिवाय पर्याय नाही. तत्पूर्वी अावर्तन १५ ते २० दिवसांअाड मिळावे, यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे अाहे.

तीव्र संताप व्यक्त
तापी नदीपात्रातील निम्न बंधाऱ्यातील पाणीसाठा सद्य:स्थितीत जास्तीत जास्त २१ दिवस पुरताे. बंधाऱ्याची उंची सव्वा फुटाने वाढवली तर हा साठा ३० दिवस पुरेल. मात्र, असे असतानाही पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यात तीन महिने पुरेल एवढा साठा करण्याचा सल्ला दिल्याने पालिका पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला अाहे.

^पालिकेने हिवाळ्यातचयाेग्य नियाेजन केले असते तर अाज ही वेळ अाली नसती. मात्र, टंचाईत दिलास देता, पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यातील पाणीसाठा ४० ते ४५ दिवस पुरवण्याचा जाे अफलातून सल्ला दिला अाहे, ताे नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारा असाच अाहे. निर्मल काेठारी, नगरसेवक

^तापी नदीवरीलबंधारा रेल्वेच्या मालकीचा असून उंची वाढवण्यास अनुमती मिळत नाही. त्यामुळे पाणीसाठा वाढवून ताे टिकवणार कसा, असा प्रश्न अाहे. पालकमंत्री, जलसंपदामंत्री, अामदार संजय सावकारेंना या संदर्भात साकडे घालू. युवराज लाेणारी,उपनगराध्यक्ष
^तीन दिवसांअाडपाणीपुरवठा हाेत असतानाही टंचाई अाहे. बंधाऱ्यातील साठ्याचा अनधिकृत वापर हाेत नाही. मात्र, असे असताना पाटबंधारे विभागाने पालिकेला दिलेले पत्र म्हणजे शहराला वेठीस धरण्याचा प्रकार अाहे. उमेश नेमाडे, माजीनगराध्यक्ष

^पाटबंधारे विभागानेमागणीप्रमाणे १५ ते २० दिवसांनी हतनूरचे अावर्तन साेडावे. ४५ दिवसांनी अावर्तन साेडण्याबाबत पत्रव्यवहार करून पालिकेला अडचणीत अाणण्याचे प्रयत्न दिसताहेत. भविष्यात सर्वपक्षीय अांदाेलन करू. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...