आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज ४० लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - येथील रेल्वे मल-जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी जानेवारीत निविदा काढली जाणार आहे. या कामाला तीन वर्षांपूर्वी रेल्वे बजेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. या जलशुद्धीकरण केंद्रासाठी एक कोटी ९० रुपयांचा निधी आवश्यक आहे. केंद्राच्या उभारणीनंतर दररोज ४० लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर शक्य होणार आहे.

रेल्वे बाेर्डाने २०१२-२०१३ या वर्षाच्या रेल्वे बजेटमध्ये भुसावळ येथील मल-जलशुद्धीकरण केंद्राला मंजुरी दिली हाेती. मात्र, मंजुरीनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी हाेते, याकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले हाेते. या प्रकल्पासाठी सुमारे काेटी ९० लाख रुपयांचा निधी आवश्यक अाहे. रेल्वे हाॅस्पिटलच्या मागे असलेल्या जागेवर या जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती केली जाणार अाहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे पाठपुरावा केला जात आहे. जानेवारीत केंद्राच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. जलशुद्धीकरण केंद्रामुळे हतनूर धरणातून होणारी पाण्याची उचल कमी होईल. पर्यायाने वीजबिलातही लाखो रुपयांची बचत हाेणार अाहे.

मदत घेणार : मल-जलशुद्धीकरणप्रकल्पनिर्मितीत रेल्वेतर्फे जीवन प्राधिकरण विभागाची मदत घेतली जाणार अाहे. रेल्वे हाॅस्पिटलमागील पंपिंग स्टेशनच्या जागेवर हा प्रकल्प साकारणार आहे. प्रकल्पामुळे जलबचतीला हातभार लागेल.

प्रक्रिया अशी होणार
रेल्वेस्थानक,रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफाॅर्मची सफाई करण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, साफसफाईनंतर वाया जाणाऱ्या पाण्यावर, मल-जलशुद्धीकरण केंद्रात दरराेज प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे रोज ४० लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा सफाईसाठी तसेच रेल्वे हद्दीतील बगिच्यांमध्ये वापरले जाईल. यामुळे पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल.

वीज बिलात होईल कपात
रेल्वेप्रशासनातर्फे हतनूर धरणातून पाण्याची उचल केली जाते. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वेस्थानक, रेल्वेची विविध कार्यालये, रेल्वेचे झाेनल प्रशिक्षण केंद्र, विद्युत इंजीन कारखाना, एमअाेएच कारखाना या सर्व ठिकाणांना पाणीपुरवठा करण्यासाठी रोज एक काेटी ३० लाख लिटर पाणी लागते. रोज एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची उचल होत असल्याने, महिन्याकाठी रेल्वेच्या इरिगेशन विभागाला १५ ते ३० लाखांचे वीजबिल अदा करावे लागते. उन्हाळ्यात हा आकडा २५ ते ३० लाखांच्या घरात जातो. मात्र, मल-जलशुद्धीकरण केंद्रामुळे पाण्याची उचल कमी प्रमाणात होईल. त्यामुळे वीजबिलात कपात होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...