आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जलसंपदा’ परीक्षेवर ढिसाळ नियोजनामुळे फेरले ‘पाणी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सरळ सेवा भरतीसाठी जलसंपदा विभागातर्फे शुक्रवारी स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. यासाठी गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन केंद्र होते. या केंद्रांवरील ढिसाळ नियोजन अाणि सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची वेळेत नाेंदणी झाल्यामुळे ६४ विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या प्रकारामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले हाेते. या वेळी पाेलिस प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. दरम्यान, याप्रकरणी विद्यार्थ्यांनी नागपूरच्या जलसंपदाच्या मुख्य कार्यालयात ई-मेल करून तक्रार केली अाहे. त्यामुळे वेळीच न्याय मिळाल्यास विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.
जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरतीला यापूर्वी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठवल्यानंतर शुक्रवारी पहिलीच परीक्षा घेण्यात अाली. यासाठी जिल्ह्यात गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन केंद्र, भुसावळच्या संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात एक मू.जे. महाविद्यालयात एक अशा एकूण चार केंद्रांवर दिवसभरात विविध तीन वेळेत परीक्षा घेण्यात आली. देवकर महाविद्यालयात सकाळी ते ११ या बॅचसाठी दोन केंद्रांवर ५०० मुलांचे नियोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना आधी नोंदणी करण्याची अट होती. त्यामुळे विद्यार्थी सकाळी वाजेपासून केंद्रावर उपस्थित हाेते. पण विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी केवळ दोनच संगणक असल्यामुळे माेठी रांग लागली हाेती. यात ‘कॅन्डिडेट नॉट फाउंड’ अाणि ‘सर्व्हर डाऊन’ अशा अडचणी अाल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. एका ठिकाणी नोंदणी हाेत नसल्यामुळे मुलांना दुसरीकडे चौकशी करण्याचा सल्ला देण्यात अाला. त्यामुळे दुसऱ्या जागी जाईपर्यंत त्यांचा बराच वेळ वाया गेला. या धावपळीत पावणे नऊ वाजून गेल्यामुळे नोंदणी थांबवण्यात आली. त्यानंतर लागलीच सकाळी वाजता पेपर सुरू झाला. नोंदणी झाल्यामुळे देवकर महाविद्यालयाच्या केंद्रावरील ६४ मुलांना परीक्षेपासून मुकावे लागले आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली, परतु त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नागपूरच्या मुख्य कार्यालयात र्इ-मेल करून तक्रार दाखल केली अाहे. या तक्रारीची दखल घेतल्यास न्यायालयात जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दर्शवली आहे.

पोलिसांचा हस्तक्षेप
गोंधळ सुरू असताना विद्यार्थी चांगलेच संतापले होते. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांना समजाऊन सांगितले. नंतर काही वेळातच पोलिसांना बोलावून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बाहेर काढले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

परीक्षा ढकण्याबाबत उमविला दिले हाेते पत्र : स्थापत्यअभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जलसंपदा विभागाचा पेपर असल्यामुळे नियमित अभ्यासक्रमातील परीक्षा पुढे ढकलण्याबाबत २१ नोव्हेंबर रोजी कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील यांच्याकडे विनंती केली हाेती. मात्र, शासनाच्या एमपीएससी, यूपीएससी यासारख्या परीक्षांच्या तारखा आधीच कळवल्या जातात. त्यामुळे त्या दिवशी उमविची परीक्षा घेतली जात नाही. तर जलसंपदा विभागाची ही परीक्षा ऐनवेळी घेण्यात आली आहे. त्यामुळे ऐनवेळी उमविच्या परीक्षेत बदल करणे शक्य होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते.

नियमित परीक्षा सोडून अनेकांनी दिली ‘जलसंपदा’ची परीक्षा
शुक्रवारी स्थापत्य अभियांत्रिकीची महाविद्यालयांमध्ये नियमित परीक्षादेखील होती; आणि त्याच दिवशी जलसंपदा विभागाची परीक्षा आल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी नियमित परीक्षा सोडून जलसंपदाच्या परीक्षेला हजेरी लावली. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे त्यांना दोन्ही परीक्षा देता आल्या नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले अाहे.

चूक प्रशासनाचीच
^आमच्या हॉलतिकिटावर देवकर अभियांत्रिकी, असे लिहिले होते. तेथे गेल्यानंतर पॉलिटेक्निकच्या इमारतीकडे पाठवण्यात आले. यात आमचा वेळ वाया गेला; त्यामुळे नोंदणी झाली नाही. प्रशासनाच्या चुकीमुळे आमची संधी वाया गेली. अश्विनीसोनार, परीक्षार्थी

सर्व्हर डाऊन झाले
^नोंदणी करीत असताना सर्व्हर डाऊनचीही अडचण आली. एकाच महाविद्यालयात दोन वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र होते. त्याबद्दल माहिती देण्यात आलेली नव्हती. या कारणांमुळे आमची नोंदणी होऊ शकली नाही. परिणामी परीक्षेपासून वंचित राहावे लागले. राहुल पाटील, परीक्षार्थी
सूचनादिल्या

^परीक्षे संदर्भात सर्व महत्त्वाच्या सूचना हॉल तिकिटासोबतच दिल्या होत्या. तसेच महाविद्यालयाच्या परिसरातदेखील फलक लावून मार्गदर्शन करण्यात आले होते. वेळेत येऊन नोंदणी करणाऱ्या मुलांनी परीक्षा दिली. आर.जी.पाटील,कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
प्रवेशपत्र दाखवताना परीक्षेपासून वंचित राहिलेले विद्यार्थी.
बातम्या आणखी आहेत...