आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची अखेर पाडळसरे धरणास भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतीच्या शास्वत विकासासाठी केलेल्या कामाची माहिती शेतकरी वर्गाला मिळण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्धी वर्षानिमित्त आयोजित शिवार संवाद सभा आयोजित करण्यात आले होते. याच दौर्यात धार मालपूर येथेही संवाद यात्रेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी आमदार डॉ बी.एस.पाटील आदि उपस्थित होते. 
 
प्रारंभी धरणस्थळावर नकाशा समजून घेतला यावेळी आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी चर्चा केली यावेळी मुख्य अभियंता एस.डी. कुलकर्णी, अधीक्षक एस एम संदानसिंग, कार्यकारी अभियंता आर.जे.पाटील, सहाय्यक अभियंता श्रेणी ए. के सूर्यवंशी, उपअभियंता एल एन सोनवणे आदिसह तहसीलदार प्रदीप पाटील, अमळनेरचे एपीआय उदयसिंह साळुंखे, मारवडचे एपीआय अवतारसिंग चव्हाण यांच्यासह विविध अधिकारी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते, त्यानंतर साईड भिंतीचे भूमिपूजन देखील मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांना पाडळसरे कलाली येथील ग्रामस्थांनी भूसंपादन मोबदला मिळावा यासाठी निवेदने दिलेत.
 
अमावस्या शुभ
गुरुवारी अमावस्या अमळनेर तालुक्यासाठी नेहमी शुभ असते असा टोला मारत उदय वाघ यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष, संवाद यात्रा आणि धरणास जलसंपदा मंत्र्यांची भेट आशी तिहेरी संधी साधल्याचे यावेळी सांगितले.
 
निधी कमी पडू देणार नाही 
पाडळसरे धरणाला ११ हजार २०० कोटी रुपये बजेटमध्ये ठेवले आहेत. महाराष्ट्रासाठी पंतप्रधान सिंचाई योजनेतून १७ हजार कोटी रुपये आणले आहेत. २७ प्रकल्प २ वर्षात पूर्ण होणार आहेत. दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त भागासाठी १० हजार कोटी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मागणी केलेले आहेत. राज्यातील प्रकल्पांसाठी नाबार्ड कर्ज व अर्धे पैसे मदत म्हणून देऊ अशा ६५ हजार कोटींचा हिशोब केलेला आहे. १५० कोटी रुपये या धरणासाठी ठेवावेत असे सचिवांना सांगितले आहे.
 
यावेळी धरणावर तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,सरचिटणीस जिजाबराव पाटील, हिरालाल पाटील, अड व्ही आर पाटील, संदीप पाटील, डॉ दीपक पाटील, प्रफुल्ल पवार, श्याम अहिरे, राजू पवार, दिनेश शिसोदे, राजेश वाघ, महेंद्र बोरसे, शितल देशमुख, राकेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सोनू पवार, संगीता भिल, व पंस सदस्य त्रिवेणीबाई पाटील, रेखाबाई पाटील, कविता पवार, भिकेश पाटील यांच्यासह आमदार शिरीष चौधरी यांचे कार्यकर्ते बजार समिती संचालक उदय पाटील, अशोक पवार आदींसह ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पाडळसरे येथील वसंत पाटील यांच्यासह काही नागरिक उपस्थित होते.
 
बातम्या आणखी आहेत...