आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा मुक्काम लांबला, हतनूरचे दरवाजे अर्धा मीटरने उघडून विसर्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहर आणि तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. खरिपाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या हंगामाला पावसाच्या हुलकावणीने उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे खरिपाचे उत्पन्न समाधानकारक येणार आहे. शहरात बुधवारपासून सलग चार दिवस अर्थात शनिवारपर्यंत दररोज समाधानकारक पाऊस होत आहे.
शनिवारी सकाळी ते १० वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला. चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने दिलासा मिळाला अाहे. शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला. एकाच रात्री १२२.२० मिलिमीटर पावसाची नोंद तालुक्यात करण्यात आली आहे. यात सर्वाधिक ३८.२० मिलिमीटर पाऊस भुसावळ महसूल मंडळात झाला. हतूनर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे आठ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून धरणात सध्या ८५.८८ टक्के जलसाठा करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याचा दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत धरणात १०० टक्के साठा केला जाणार असल्याचे नियाेजन अाहे.

Áअनेक ठिकाणी साचले तळे : शहरातशुक्रवारी सायंकाळी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी तळे साचले. यात प्रामुख्याने न्यायालयामागील भागात न्यायाधीश निवास, जामनेर रोडवरील रंगोली हॉटेल सिंधी कॉलनी परिसर, बाजरपेठ पोलिस ठाण्यासमोरील लोखंडी बोगदा, पंचशिलनगरचा काही भाग अशा ठिकाणी तळे साचले होते.

Áपाणलोट क्षेत्रात ३२९ मििलमीटर : हतनूरधरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या ४८ तासांत तब्बल ३२९.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात बऱ्हाणपूर २४.८, देडतलाई २३.२, टेक्सा ६.२, ऐरडी ४८.८, गोपाळखेडा ३२.०, लखपुरी ८६.८, चिखलदरा ६५.०, लोहारा १७.८ आणि हतनूर धरणावर २५.० मिलिमीटर पावसाची नोंद केंद्रीय जल आयोगाकडून करण्यात अाली.
शहरात शनिवारी सकाळी ते १० वाजेदरम्यान पाऊस झाल्याने विद्यार्थीही चिंब भिजले.

तालुक्यातील पाऊस
महसूलमंडळ पाऊस (मिमी)
भुसावळ ३८.२
वरणगाव२२.००
पिंपळगाव२७.००
कुऱ्हेपानाचे ३५.००
सरासरी टक्केवारी
तालुकाटक्केवारी
भुसावळ ८३
यावल ७१
रावेर ६८
मुक्ताईनगर ६०
बोदवड ६९

धरणात ३५२ दलघमी जलसाठा
हतनूरचा साठा पाणलोटक्षेत्रातील पावसाने वाढला आहे. शनिवारी दुपारी ४.३० वाजता जलपातळी २१३.४०० मीटर तर ३५२.०० दशलक्ष घनमीटर जलसाठा हाेता. शनिवारी आवक वाढल्यामुळे सकाळी वाजता आठ दरवाजे अर्धा मीटर उघडून २७६ क्युमेक्स प्रतीसेकंद वेगाने तापी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला, अशी माहिती उपविभागीय अभियंता एस. आर. पाटील यांनी शनिवारी दिली.
शहरासह तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस मुक्कामी अाहे. शुक्रवारी एकाच दिवशी शहरात तब्बल १२२.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पावसामुळे हतनूरचे आठ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातील जलसाठा आता ८५.८८ टक्क्यांवर पोहाेचला आहे. शनिवारी सकाळी ते १० रात्री ते ९.३० वाजेदरम्यान शहरात दमदार पाऊस झाला. दिवसभरात तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. परतीच्या पावसामुळे रब्बीच्या अाशा पल्लवित झाल्या अाहे.

बातम्या आणखी आहेत...