आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाळमिश्रित पाणीपुरवठ्याची समस्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. गाळमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने लाेकभावना प्रचंड तीव्र आहेत. पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने सार्वजनिक अाराेग्याचा प्रश्न बिकट बनला अाहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना अत्यंत आवश्यक झाल्या आहेत.
पालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा नागरिकांच्या जीवावर उठली अाहे. पावसाळ्यात हतनूर धरणातून मिळणाऱ्या पाण्याच्या अावर्तनात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने या महत्त्वाच्या आणि साथरोगाचा फैलाव अधिक होण्याचा धोका असलेल्या काळातच नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात दूषित पाणीपुरवठा हाेत अाहे.

जलशुद्धीकरणातील कोणतीही यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नाही. यामुळे नदीपात्रातून उचललेल्या पाण्यावर काही प्रमाणात प्रक्रिया करून हेच पाणी नागरिकांना वितरित केले जाते. कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने सध्या नागरिकांना गाळमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेवर सेटनिंग टँक, क्लोरिफाक्युरेटर, सॅण्ड फिल्टर आदी कोणतीही यंत्रणा सध्या १०० टक्के काम करीत नाही. साठवलेल्या पाण्याच्या तळाशी गाळाचा थर जमा होणे, दुर्गंधी येणे आदी प्रकार नित्याचे झाले आहेत. क्लोरिन अॅलमचा वापर अत्यल्प हाेत अाहे. त्यामुळे शहरात दूषित पाणीपुरवठ्याची समस्या वाढली असून, पालिका प्रशासनाविषयी नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

^पाणीपुरवठा अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत. मुख्याधिकारी हजर झाल्यानंतर प्रथम दुरुस्तीची कामे हाती घेऊ. अमृत योजनेतून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अख्तरपिंजारी, नगराध्यक्ष, भुसावळ
पाण्यात निघतेय शेवाळ : नदीतूनउचललेल्या पाण्यावर बऱ्याचवेळा कोणतीही प्रक्रिया होत नाही. केवळ क्लोरिन सोडून हे पाणी वितरित केले जाते. यामुळे पाण्यासोबत शेवाळदेखील येते. एक दिवस साठवलेल्या पाण्यातही शेवाळाची निर्मिती होते.

गळती ५० टक्के : रॉ-वॉटरकेंद्रातून उचलले जाणारे पाणी आणि प्रत्यक्ष नागरिकांना मिळणाऱ्या पाण्यात गळतीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आहे. हे प्रमाण नियमांनुसार २० टक्क्यांच्या आत हवे. मात्र, गेले सहा महिने समस्या कायम आहे.

यंत्रणा रामभराेसे : पालिकेच्यापाणीपुरवठा यंत्रणेवरील पहिला टप्पा १९५८ तर दुसरा टप्पा १९७१ मध्ये स्थापन झाला. अभियांत्रिकीच्या नियमांनुसार पहिला टप्पा १९८८मध्ये तर दुसरा टप्पा सन २००१मध्येच कालबाह्य झाला आहे. तरी याच प्रकल्पातून पाणी मिळते.

अभियंते देखील घरून आणतात पाणी
पालिकापाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता ए. बी. चौधरी हे सुद्धा पालिकेचे अशुद्ध पाणी पित नाहीत. कार्यालयात येतानाच ते घरून फिल्टरचे पाणी घेऊन येतात. पालिका कार्यालयातही नगरसेवक मंडळी बाटली बंदच पाणी पितात. अर्थात पालिकेचे पाणी पिण्यायोग्य नसल्यानेच त्यांच्याकडून हे पाणी पिणे टाळले जाते. या उलट शहरातील लाख ८७ हजार नागरिकांना मात्र हेच अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना गरजेच्या झाल्या आहेत.