आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी,त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या हातपंप, बोअरवेल दुरुस्तीसंदर्भातील भ्रष्टाचाराची चौकशी त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शाखा अभियंत्यांनी दिलेल्या मोघम अहवालामुळे संशय वाढत असून त्यातील नोंदी प्रत्यक्ष तपासणी लवकरच करण्यात येणार असल्याचे विशेष लेखा परीक्षक तथा चौकशी अधिकारी एस.बी.भोर यांनी दिली.
पाणीपुरवठा विभागांतर्गत तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनांवरील साधनसामग्रीची दुरुस्ती देखभाल केली जाते, असे असतानाही मक्तेदाराकडून मोठ्या प्रमाणात यावर खर्च करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच एकाच पंपावर वारंवार दुरुस्तीचा खर्च दाखवून बिलेदेखील हडपण्यात आली आहेत. याबाबत आयुक्तांच्या आदेशानंतर सुरू झालेल्या चौकशीदरम्यान शाखा अभियंत्यांनी विहिरी, हातपंप बोअरवेलसंदर्भातील अहवाल सादर केले आहेत. यातील माहिती मोघम स्वरुपाची असल्याने भ्रष्टाचाराचा संशय वाढत चालला आहे. यासंदर्भात २०० एमबी रेकॉर्ड जप्त करून सील करण्यात आले आहे.

पाणी पुरवठ्याशी संबंधितांचा समितीत समावेश
प्रत्येकनोंद प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळण्याची शक्यता लक्षात घेता तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी आता एक अभियंता पाणीपुरवठा विभागाशी संबंधित लोकांची समिती गठीत करण्यात आली आहे. यात चौकशी अधिकारी म्हणून विशेष लेखा परीक्षक एस.बी.भोर, प्रकल्प विभागाचे अभियंता योगेश बोरोले जलशुद्धीकरण केंद्रातील केमिस्ट विजय यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. कागदावरील नोंदीच्या आधारे येत्या आठवड्यात स्पॉट व्हिजिट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.