आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water Supply Department Empyoee Presenty Investigation Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरी बसून पगार लाटणार्‍या ‘सह्याजी’रावांची चौकशी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दीड वर्षापासून बंद असलेल्या सावखेडा जलशुद्धीकरण प्रकल्पावर कार्यरत असल्याचे दाखवून पाणीपुरवठा विभागाच्या 10 कर्मचार्‍यांच्या पगारावर 18 महिन्यांत 34 लाख 34 हजार 841 रुपये खर्च झाला आहे. तसेच बंद प्रकल्पावरील कर्मचार्‍यांचा इतरत्र उपयोग करून न घेता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याची चौकशी सुरू झाली असल्याने घरी बसून पगार लाटणार्‍यांच्या अडचणी वाढणार आहेत.

पालिका प्रशासनासमोर ‘सह्याजी’रावांना कामाला लावण्याचे मोठे आव्हान आहे. पालिकेचे युनिट कार्यालय व ज्या प्रकल्पाकडे अधिकारी फिरकूनही पाहत नाहीत, त्या ठिकाणी केवळ हजेरी लावून पगार लाटणार्‍यांची संख्या मोठी आहे. वाघूर धरणावरून पाणीपुरवठा सुरू झाल्यापासून इतर पाणीपुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्रही बंद अवस्थेत आहे. या कर्मचार्‍यांचा इतरत्र उपयोग करता आला असता. त्यामुळे उमाळा जलशुद्धीकरण केंद्र व वाघूर डाऊन स्कीमच्या ठिकाणी इतर विभागातील मनुष्यबळ वापरावे लागत आहे. त्यामुळे बंद प्रकल्पांवर कार्यरत ‘सह्याजी’रावांची चौकशी सुरू झाली आहे.