आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Supply For Jalgaon On Alternate Days Still Pending

जळगावकरांना दिवसाआड पाण्याचा निर्णय लोंबकळलेलाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगावकरांना एक दिवसाआड पाणी देण्यासाठी आधी जलवाहिनीच्या गळती बंद झाल्या पाहिजेत. त्यासाठी संबंधित ठेकेदाराशी तडजोड करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ठेकेदाराने कंत्राट गुंडाळण्याचाच प्रस्ताव ठेवल्यामुळे या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

महापौर राखी सोनवणे यांनी त्यांच्याच दालनात शुक्रवारी ही बैठक बोलावली होती. त्यात पाणीपुरवठा दिवसाआड करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. वाघूर प्रकल्प व देखभाल-दुरुस्तीचे काम दिलेल्या तापी प्रिस्ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या मक्तेदाराच्या आर्थिक देवाणघेवाणीवरच तीन तास चर्चा झाली; मात्र, त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णयही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी प्रय} करणार असल्याचा संकल्प महापौर राखी सोनवणे यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केला होता. एक दिवसाआड पाणीपुरवठा करायचा असल्यास अगोदर मोठय़ा गळत्या दुरुस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी शुक्रवारी महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीस तापी प्रिस्ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दीपेश कोटेचा, लेखापाल विलास कुलकर्णी व पालिकेतर्फे महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन, सभागृहनेते नितीन लढ्ढा, पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती नितीन बरडे, आयुक्त संजय कापडणीस, प्रकल्प अधिकारी एस.जे.बोरोले, शहर अभियंता डी.एस.खडके उपस्थित होते. बैठकीत तीन तास चर्चा झाली; मात्र संपूर्ण बैठकीत गळत्या दुरुस्तीसंदर्भातील विषय चर्चेस आला नाही. या वेळी मक्तेदाराने पालिकेकडे आपले साडेआठ कोटी रुपये घेणे असल्याचे सांगितले. पालिका प्रशासनाने मात्र असे कोणतेही घेणे निघत नसल्याचे स्पष्ट केले.

प्रशासनाने मांडलेले मुद्दे

0 पालिकेविरुद्ध कोणताही दावा दाखल न करण्याच्या अटीवर कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आणण्याची तयारी.

0 लेखापरीक्षणात ताशेरे ओढले असल्याने थकित रक्कम देण्याचा मुद्दा राखून ठेवला आहे.

0 देखभाल-दुरुस्तीचे काम झाले नसल्याने मागणी करण्यात येत असलेले बिल मान्य नाही.

मक्तेदाराने मांडलेले मुद्दे

0 पालिकेने कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आणून कायदेशीररीत्या आम्हाला मोकळे करावे.

0 1997पासून आतापर्यंत झालेल्या कामाचे बिल अदा करावे.

0 2008पासून देखभाल-दुरुस्तीच्या कामाची थकित रक्कम अदा करावी.