आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पावसाळ्यामुळे क्राॅम्प्टनतर्फे वाघूर पाणीपुरवठा याेजनेंतर्गत उच्च दाब वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे मनपातर्फे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात अाले अाहे. त्यामुळे शहरात १८ राेजीचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला असून, बुधवारचा पुरवठा गुरुवारी हाेणार अाहे.

वाघूर पाणीपुरवठा याेजनेंतर्गत असलेल्या ३३ केव्ही फीडरच्या उच्च दाब वीजवाहिनीच्या खांब्यांना कॉंक्रिटीकरण करण्याचे अंदाजपत्रक मंजूर झाले अाहे. सध्या १० ते १२ खांबे बऱ्याच प्रमाणात वाकले असून, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ते खांबे काेसळण्याची शक्यता वाढली अाहे. तसे झाल्यास वीजपुरवठा विस्कळीत हाेऊ शकताे. त्यामुळे हे काम करणे गरजेचे अाहे. त्यासाठी क्राॅम्प्टनच्या वतीने १८ राेजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार अाहे. तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे काव्यरत्नावली चाैकातील १२०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम १७ राेजी दुपारी १२ वाजेनंतर होणार अाहे. त्यामुळे १८ राेजी हाेणारा पाणीपुरवठा बंद ठेवला असून, ताे एक दिवस पुढे ढकलला अाहे.

असे आहे वेळापत्रक
१८राेजी हाेणारा पाणीपुरवठा १९, तर १९ २० जून राेजीचा पुरवठा अनुक्रमे २० २१ राेजी करण्यात येणार अाहे. त्यामुळे नागरिकांना बदललेल्या नियाेजनाचा फटका बसण्याची शक्यता अाहे.