आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा दाेन दिवसांनी लांबला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या दाेन दिवसांपासून जलवाहिनी दुरुस्तीमुळे ठप्प झालेला पाणीपुरवठा अाणखी दाेन दिवस लांबला अाहे. लक्ष्मीनगरातील गळती दुरुस्तीचे काम सुरू असताना एक नव्हे तर तीन पाइप खराब असल्याचे दिसून अाले. त्यामुळे रविवारी दुपारपासून पुन्हा खाेदकामाला सुरुवात झाली. साेमवारी दिवसभर काम चालण्याची शक्यता असल्याने मंगळवारी पुरवठा हाेणार अाहे.

मेहरूणमधील लक्ष्मीनगरात गळती दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने कंत्राटदारामार्फत शुक्रवारी हाती घेतले आहे. शनिवारी पहाटे मॅन हाेलमध्ये कामगारांमार्फत जलवाहिनीच्या अातील बाजूस जाऊन गळतीचा शाेध घेतला. मात्र, गळती शाेधताना एक नव्हे तर तीन पाईप खराब असल्याचे अाढळून अाले. ते बदलण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रविवारी दुपारनंतर पाणीपुरवठ्याच्या अनिश्चिततेवर शिक्कामाेर्तब करण्यात अाला. सुटीच्या दिवशी पाणी येणार म्हणून अनेकांनी केलेले नियाेजन िफस्कटले.

पाणीसंकटाला पुन्हा द्यावे लागणार ताेंड
गेल्यावर्षी कमी झालेला पावसाळा त्यामुळे शहरातील बाेअरिंग विहिरीच्या पाणी पातळीत अातापासून घट हाेत अाहे. अशा परिस्थितीतही वाघूर धरणातील जलसाठा अधिक असल्याने शहराला पाणी समस्येला ताेंड देण्याची गरज नसल्याची स्थिती अाहे. परंतु जलवाहिनीची समस्या कायम असल्याने पाणी असूनही टंचाईला सामाेरे जाण्याची वेळ जळगावकरांवर येत अाहे. जलवाहिनीसाठी टाकण्यात अालेले पाइप सातत्याने फुटत असल्याने ही समस्या डाेकेदुखी ठरू लागली अाहे. अाता एक दिवसाने पाणीपुरवठा ढकलण्याचे नियाेजन असताना अाणखी दाेन पाइप खराब निघाल्यामुळे तब्बल तीन दिवसांनी पुरवठा पुढे ढकलावा लागणार अाहे. त्यामुळे अाता २३ राेजी हाेणारा पुरवठा २६ राेजी करण्यात येणार अाहे. तर २४ २५चा पुरवठा २७ २८ राेजी केला जाणार अाहे. वारंवार येणारी अडचण पाहता ही संपूर्ण जलवाहिनी अमृत याेजनेतून बदलण्याची गरज व्यक्त हाेत अाहे.

दोन पाइपांसाठी पुन्हा खोदकाम
शुक्रवारीतीन खड्डे खाेदूनही गळती सापडत नसल्याची स्थिती हाेती. शनिवारी पहाटे गळतीचा शाेध लागला. मात्र, पाणीपुरवठा विभागासमाेर अाणखी दाेन पाइप बदलण्याचे माेठे संकट उभे राहिले अाहे. या पाइपांचा ज्वाॅइंट रिंग खराब असल्याने तसेच पाइपाचा तुकडा पडल्याने त्यासाठी खाेदकामाला रविवारी दुपारी वाजेपासून सुरुवात करण्यात अाली. रात्री पाच फुटांच्या दाेन पाइपांसाठी पुन्हा नव्याने खाेदकाम करण्याचे काम रविवारी रात्रीपर्यंत सुरू हाेते. या ठिकाणी लाेखंडी पाइप टाकणे, वेल्डिंग करणे हे करण्यासाठी साेमवारचा पूर्ण दिवस जाण्याची शक्यता अाहे.