आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळतीची दुरुस्ती पूर्ण; अाज पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण बुरुजा जवळ जलवाहिनीच्या दाेन पाइपाच्या जाॅइंटमधील रबर रिंग सटकल्याने पाणीटंचाईचे संकट जळगावकरांसमाेर उभे राहिले हाेते. शुक्रवारी दुपारी ३० तासांच्या प्रयत्नानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दुपारनंतर टेस्टिंगदेखील यशस्वी झाल्याने शनिवारी शहरात पाणीपुरवठा करण्यात येणार अाहे.
वाघूरच्या १२०० मिमीची मुख्य जलवाहिनी फुटण्याचे प्रमुख ठिकाण झालेल्या मेहरूणमध्ये गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा जलवाहिनीला गळती लागली हाेती. गळतीचे स्वरूप पाहता जलवाहिनीला माेठे भगदाड पडल्याचा अंदाज बांधला जात हाेता. परंतु प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम हाती घेतले असता पाइप फुटलेला नव्हता तर दाेन पाइपातील जाॅइंटमधील रबर रिंग सटकल्यामुळे गळती सुरू झाली हाेती. सिमेंट पाइपास शिसे सिमेंटचा जाॅइंट करण्यात अाले. त्यानंतर लक्ष्मीनगरातील ब्लाॅकच्यावर असलेली किरकाेळ दुरुस्तीदेखील तातडीने करून घेण्यात अाली. दुपारी वाजता जलवाहिनीत पाणी साेडून टेस्टिंग करण्यात अाली. यात कुठेही गळती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरातील सर्व जलकुंभ भरण्याचे काम हाती घेण्यात अाले हाेते.

या भागात येणार पाणी
कांचननगर,अासाेदा राेड, रामेश्वर काॅलनी, एमडीएस काॅलनी, मास्टर काॅलनी, अयाेध्यानगर, माेहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, दांडेकरनगर, मानराज पार्क, अासावानगर, निसर्ग काॅलनी, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पाेलिस काॅलनी, खाेटेनगर, शिवाजीनगर हुडकाे, प्रजापतनगर, एसएमअायटी, याेगेश्वरनगर, खेडी, तांबापुरा, वाघनगर, शिव काॅलनी, पाेस्टल काॅलनी, विवेकानंद नगर, जिल्हाराेड, रामदास काॅलनी, शारदा काॅलनी, महाबळ काॅलनी, अाॅफीसर क्लब टाकी परिसर.