आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यरत्नावलीतील गळतीच्या शाेधासाठी अाज पाणीपुरवठा बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काव्यरत्नावली चाैकात गेल्या तीन दिवसांपासून चार ते पाच खड्डे खाेदूनही गळती सापडल्याने अाता थेट शनिवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. शुक्रवारी सायंकाळपासून या कामाला सुरुवात झाली अाहे. गळती शाेधून ती दुरुस्त करण्यासाठी जवळपास २५ तासांचा कालावधी लागणार असल्याने एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात अाला.
वाघूर पाणीपुरवठा याेजनेंतर्गत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीस काव्यरत्नावली चाैकात गळती लागल्याने बुधवारी चार ते पाच ठिकाणी खड्डे खाेदण्यात अाले हाेते. त्यात दाेन ठिकाणी पाइपलाइनच्या जाॅइंटची दुरुस्ती करण्यात अाली हाेती; परंतु अारटीअाे कार्यालय ते काव्यरत्नावली चाैकापर्यंत रस्त्यास प्रमुख जलवाहिनीस सुमारे २० फुटांपर्यंत उतार असल्याने पाइपलाइनच्या तळापासून पाणी गळतीचा शाेध घेण्यात अडचण निर्माण हाेत अाहे. अारटीअाे कार्यालय ते काव्यरत्नावली चाैकापर्यंत असलेल्या पाइपलाइनला १५ ते १६ जाॅइंट असल्याने सर्व जाॅइंटजवळ खाेदकाम करून पाइपलाइनची गळती शाेधणे अवघड झाले अाहे.


रविवारी या भागात पुरवठा
रविवारी नटराज टाॅकीज ते चाैघुले मळ्यापर्यंतचा भाग, शनिपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, हाैसिंग साेसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल-हुडकाे, भाेईटेनगर, भिकमचंद जैननगर, जुने गाव, सिंधी काॅलनी, इंडिया गॅरेज, अाेंकारनगर, जाेशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट काॅलनी, ईश्वर काॅलनी, वर्षा काॅलनी, तांबापुरा, गणपतीनगर, अादर्शनगर, प्रभात काॅलनी, ब्रुकबाॅण्ड काॅलनी.

बातम्या आणखी आहेत...