आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात टँकरचे दर वाढवण्याचा हालचाली; अग्निशमन विभागाकडून प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील नागरिकांना घरगुती किंवा व्यावसायिक वापरासाठी पालिकेतर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. अग्निशमन विभागाच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात आहे. अनेक वर्षांपासून या सेवेची दरवाढ झालेली नाही. इंधनाचे दर वाढण्यासह इतर बाबींचे दरही वाढल्याचे कारण पुढे करीत सध्या अस्तित्वात असलेले दर दुप्पट करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासह टँकरद्वारे आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. महापालिका हद्दीत एखाद्या ठिकाणी पाणीपुरवठा झालेला नसल्यास किंवा इतर कारणास्तव पाण्याची गरज भासत असल्यास पिण्याच्या कारणासाठी टँकर मागविल्यास यासाठी सध्या 200 रुपये प्रति टँकरप्रमाणे दर वसूल केले जातात. हॉटेल, बांधकाम किंवा अन्य व्यावसायिक कारणासाठी पाण्याचे टँकर मागितल्यास यासाठी 400 रुपये प्रति टँकर प्रमाणे दर वसूल केले जातात. अनेक वर्षांपूर्वी ठरलेले हे दर बदल करण्यात आलेले नाहीत. इंधनाचे दर आणि इतर बाबींचे दर काही वर्षात बरेच वाढले असल्याचे कारण पुढे करत टँकरद्वारे करण्यात येणाºया पाणीपुरवठ्याचे दर दुप्पट करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
टँकरसेवा हस्तांतरणाचाही प्रस्ताव
शहरात होणाºया आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रमुख काम असलेल्या अग्निशमन दलात 3 बंब व 6 टँकर आहेत. टँकरच्या माध्यमातून रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झाडांना पाणी देणे, नागरिकांना किंवा समारंभांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी अग्निशमनकडे आहे. झाडांना पाणी देण्यासाठी बांधकाम विभागाकडे आणि नागरिकांना पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे टँकर हस्तांतरण करण्याच्याही हालचाली सुरू आहेत.
प्रशासनासमोर टिपणी ठेवणार
शहरातील कुठल्याही भागात पिण्याचे किंवा व्यावसायिक वापरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर पाठविल्यास किमान 20 किलो मीटर गाडी फिरते. इंधनाचे वाढलेले दर व इतर बाबी पाहता जुने दर परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळे सुधारित दर मान्यतेसाठी टिपणी तयार केली असून प्रशासनासमोर व नंतर स्थायीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल.
- वसंत कोळी, प्रभारी अग्निशमन अधिकारी