आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wave Of Mayor Selection : Kishor Patil Become Mayor

वारे महापौर निवडीचे : किशोर पाटील होणार महापौर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिकेच्या रिक्त झालेल्या महापौर पदासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असली तरी या वेळी मराठा व्यक्तीला संधी देण्याचा निर्णय खान्देश विकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. आमदार सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली तीन टर्म निवडून आलेले किशोर पाटील यांना पुढील पाच महिन्यांसाठी महापौरपदाची संधी देण्यात आली आहे.

पालिकेच्या आठव्या महापौर जयर्शी धांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 28 मार्च रोजी निवड कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पदासाठी सुनील महाजन व किशोर पाटील यांच्यात चुरस असली तरी ज्येष्ठ नगरसेवक म्हणून पाटील यांना संधी देण्याचा निर्णय मुंबईतून देण्यात आला आहे. त्यामुळे लेवा पाटील समाजानंतर मराठा समाजाला संधी उपलब्ध झाली आहे.

आज अर्ज दाखल करण्यात येणार
गुरुवारी खान्देश विकास आघाडीतर्फे नगरसचिव कार्यालयातून तीन अर्ज घेण्यात आले असून शुक्रवारी किशोर पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात येईल. शहरातील औद्योगिक वसाहतीचे आरक्षण उठवण्याच्या प्रकरणात पाटील यांचे नाव आल्याने त्यांची संधी हुकण्याची स्थिती निर्माण झाली होती. पक्षातील काही ज्येष्ठ नगरसेविकांनी या नावाबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी र्शेष्ठींचा निर्णय बदलवण्यात आला नाही. किशोर पाटील यांना पाच महिन्यांची संधी मिळणार आहे. जर जुलैच्या मध्यानंतर आचारसंहिता लागली तर त्यांना कामे करण्यासाठी फक्त चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.