आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची वाट पाहता बाेळीतील मार्गाची दुरुस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
way repair's wait for  administration - Divya Marathi
way repair's wait for administration
जळगाव -शहरातील मध्यवर्ती भागातील बड्या इमारतीमागील असलेल्या बोळांमधील मोकळ्या जागा दुरुस्ती अभावी पडून असल्याने त्या कचराकुंडीचे केंद्र बनत चालले आहे. या जागेच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाची वाट पाहता स्वखर्चातून सिमेंटच्या गटारी त्याच्यावर ढापे बांधून, परिसर स्वच्छ ठेवून तो वापरण्यायोग्य बनवण्याचा आदर्श उपक्रम शहरातील नवीपेठेतील एकता रिटेल पतसंस्थेने राबवला आहे.
शहरातील विविध भागांत लागून असलेल्या बहुतांश इमारतीमागील जागेचा उपयोग हा पाण्याचा निचरा करण्यासह वाहनांच्या पार्किंगसाठी करण्यात येत असल्याचे दिसून येते. यामुळे दोन इमारतींमागील किमान २० फुटांपेक्षा जास्त रस्ता निघेल, अशा जागा नवीपेठेसह विविध भागांत दिसून येतात. मात्र, या जागेचा योग्य वापर होत नसल्याने त्याचा उपयोग कचराकुंडीसाठी केला जात आहे. नवीपेठेतील बँक स्ट्रिट परिसरातील अनेक इमारतींमागील जागेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने या जागांचा वापर शून्य आहे. या भागातील बँका, व्यावसायिक रहिवाशांनी पुढाकार घेतल्यास या जागेचा वापर पार्किंगसह इतर वापरासाठीही होणे शक्य अाहे.

नवीपेठेतील युनियन बँकेमागील रस्त्याबाबत मनपाकडे अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्षच केले. यावर एकता रिटेल पतसंस्थेने कार्यालयासमोरील ६० फुटांच्या दोन्ही बाजूच्या गटारी नव्याने तयार केल्या. यासह पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींना जाळ्या बसवल्या.

या कामासाठी सुमारे एक लाखांपर्यंत खर्च
मुख्यरस्त्याकडे जाण्यासाठी जवळचा हा मार्ग आहे. अनेकदा महापालिकेकडे तक्रारी करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. घाणीसह खराब रस्त्यांचा त्रास होत असल्याने पतसंस्थेच्या पुढाकारातूनच गटारींवर ढापे तयार करण्यासह रस्त्याच्या दुरुस्तीची कामे स्वत:च करून घेतली आहे. यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. याआधी बोळीतून जाणे टाळले जात होते. आता जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. यासह रहिवाशींना वाहने लावण्यासाठीही जागा उपलब्ध झाली आहे
ललितबरडिया, अध्यक्ष, एकता रिटेल किराणा पतसंस्था
नवीपेेठेतील युनियन बँकेच्या मागील गल्लीत केलेली रस्त्याची दुरूस्ती.