आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानात बदलाने थंडी-तापाचे रुग्ण वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये विषाणुजन्य आजार, घसा खवखवणे, दुखणे आदीचे रुग्ण सर्वाधिक असून बाह्यरुग्ण विभागात 70 टक्के हेच रुग्ण दिसून येत आहेत. प्रौढांप्रमाणेच लहान मुलेही या संसर्गामुळे त्रस्त झाली आहेत. हवामानातील बदलामुळेच यंदा रुग्णसंख्या दुपटीने वाढल्याचे वैद्यकतज्ज्ञांनी सांगितले. यात व्हायरल व थ्रोट इन्फेक्शनचे अधिक रुग्ण आहेत.

सद्या दिवसभर कडक ऊन व रात्री थंडी पडत आहे. त्यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाला आहे. असे वातावरण अनेक विषाणूंच्या जन्मासाठी पोषक असते. त्यामुळेच सध्या विषाणुजन्य आजार, घशाचा संसर्ग झालेले रुग्ण वाढले आहेत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. पण घरी पथ्यपाणी व औषधोपचाराने चार-पाच दिवसात आजार बरा होतो.

यामुळे होईल फायदा
0 सकाळी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. मिठातील अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीमुळे जिवाणू नष्ट होतील आणि टॉन्सिल्सलाही आराम मिळेल.
0 पाण्यात दोन चमचे मेथीचे दाणे टाकून उकळा आणि थोडे थंड झाल्यावर त्याच्या गुळण्या करा.
0 घशात खवखव झाल्यावर कोमट पाणीच प्यावे. यामुळे त्रास कमी होतो. वाटल्यास पाणी उकळताना तुळशीची पानेसुद्धा टाकता येतील.
0 याशिवाय तीन ते चारवेळा आल्याचा चहा प्यावा. यामुळे घशाला आराम मिळेल.
0 भाज्यांचे सूप पिल्याने अन्नाचा घास गिळताना होणारा त्रास कमी होतो.
0 मधात आल्याचा रस मिसळून त्याचे एकएक चमचा सेवन करावे. दिवसातून चारवेळा सेवन केल्यास आराम मिळेल.


यामुळे होतो संसर्ग
0 शीतपेये आइस्क्रीम किंवा ग्रीसी फूडच्या सेवनाने संसर्ग होतो.
0 भरपूर पाणी न पिल्यास घसा कोरडा होतो आणि वातावरण थंड होताच संसर्गाची शक्यता वाढते.
0 सर्दी झाल्यावर जेव्हा पीडित तोंडाने श्वास घेतो, तेव्हा घसा कोरडा पडतो. अशावेळी धुळीचे कण तोंडात गेल्यानेसुद्धा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.


गर्दीची ठिकाणे टाळावीत
सद्य:स्थितीत विषाणुजन्य आजार, डेंग्यूसदृश आजार, कावीळ, गोवर असे आजार प्रामुख्याने वाढले आहेत. व्हायरल न्यूमोनियाचे प्रमाण किंचित कमी झाले आहे. लहान मुलांसाठी गर्दीचे ठिकाण टाळणे आवश्यक आहे. अतिथंडीमुळे बालदम्याचे रुग्ण वाढतात, सद्या थंडीतापाची संख्या अधिक आहे. डॉ.हेमंत पाटील, बालरोगतज्ज्ञ

घशाच्या संसर्गाची लक्षणे
हलका ताप, घशात खवखवणे, अन्नाचा घास गिळताना त्रास होणे आणि आवाजात बदल होणे यासारख्या समस्या उद्भवल्यास तुमच्या घशाला एखाद्या संसर्गाने जखडले आहे, असे समजावे.