आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Websites News In Marathi, Government Offices Websites Not Update Issue At Jalgaon, Divya Marathi

शासकीय कार्यालयांची संकेतस्थळे नावालाच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आयएसओ मानांकनाचा डंका पिटणार्‍या जळगाव जिल्हा प्रशासकीय यंत्रणेचा ऑनलाइन कारभार मात्र कासवगतीने सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बदलून नऊ महिने उलटले तरी शासनदरबारी अजूनही गुलाबराव देवकर हेच पालकमंत्री, तर जिल्हाधिकार्‍यांची बदली होऊन दहा दिवस होऊनदेखील ज्ञानेश्वर राजूरकरांचे नाव अद्यापही आहे. त्यामुळे जळगाव शहरातील अपवाद वगळता शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ केवळ नावालाच असल्याची स्थिती आहे.

नागरिकांचा संपर्क असलेल्या शहरातील काही शासकीय कार्यालयांच्या संकेतस्थळांना ‘दिव्य मराठी’ने भेट दिली. त्यात 80 टक्के कार्यालयांच्या संकेतस्थळांवर जुनीच माहिती उपलब्ध असल्याचे दिसून आले. तसेच त्यात कुठलीही सुधारणा केलेली दिसून आली नाही. मुळातच संगणक शिकण्याची इच्छा नसलेले अनेक शासकीय कार्यालयांतील कर्मचारी आता कुठे संगणकाचा वापर करू लागले आहेत. मात्र, अजूनही त्या कर्मचार्‍यांची मानसिकता बदललेली नाही. त्यामुळे शासकीय कार्यालये अजूनही पूर्णत: हायटेक झालेली दिसून येत नाहीत. कारण अधिकार्‍यांच्या बदल्या होऊनही त्यांची नावे संकेतस्थळांवर तशीच आहेत. त्यामुळे घरी बसून शासकीय कार्यालयांची माहिती ऑनलाइन तपासणार्‍या व्यक्तींना केवळ प्राथमिक माहितीच मिळणार आहे. असे असले तरी उमवि, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ मात्र अपडेट आहे.

कलेक्टर, जिल्हा परिषद, मनपाच्या संकेतस्थळाचा निविदांपुरताच वापर!
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व महापालिकेचे संकेतस्थळ अपडेट असले तरी, त्यावर नागरिकांच्या उपयोगाची माहिती फारच कमी आहे. त्यावर संबंधित विभागांचे शासनादेश कुठेही दिसत नाहीत. केवळ निविदांपुरत्याच या वेबसाइट्स अपडेट केल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेने अधिकार्‍यांचा बायोडाटा व कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाहाबाबतचा उतारा मात्र न विसरता उपलब्ध करून दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय(www.jalgoan.nic.in)
जिल्हाधिकार्‍यांची बदली होऊन आठवडा उलटला तरीही संकेतस्थळावर जुन्या जिल्हाधिकार्‍यांचाच फोटो.
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा अनेक अधिकार्‍यांची नावेही जुनीच.
भेट देणार्‍यांची संख्या 4,07,579

महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ
(www.maharashtragovministarslist.com)
मंत्रिमंडळाच्या याद्याही सुधारित नाहीत.
संकेतस्थळावर जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही गुलाबराव देवकरच.

तापी पाटबंधारे महामंडळ
(www.mahatidc.org)
निविदांशिवाय कुठलीही माहिती परिपूर्ण उपलब्ध नाही.
उपलब्ध असलेली माहितीही मिसफॉण्ट आहे.

जिल्हा परिषद (www.zpjalgaon.gov.in)
नियमितपणे अपडेट नाही.
पण अलीकडेच विकास कामांचे फोटो या संकेतस्थळावर अपलोड केले आहेत.
विभागांची ओझरती माहिती दिली आहे.
भेट देणार्‍यांची संख्या : 4,92,247

एसटी महामंडळ (www.msrtc.gov.in)
11 जानेवारी 2007नंतर वाहनांचे अपडेट केलेले टाइमटेबल नाही.
संकेतस्थळावरील माहिती जुनी असून, फोटोही जुनेच आहेत.
अधिकारी व नवीन धोरणांविषयी माहिती नाही.

पोलिस मुख्यालय
अधिकारी-कर्मचार्‍यांविषयी व नवीन कुठलीही माहिती नाही.
दोन महिन्यांपूर्वी निविदांपुरतेच अपडेट.
भेट देणार्‍यांची संख्या : 67,524

उत्तर महाराष्ट विद्यापीठ
परिपूर्ण माहिती अपडेट केली आहे.
इतर विद्यापीठांचीही माहिती येथे उपलब्ध.
परीक्षांविषयी व शासन अध्यादेशही उपलब्ध.
या संकेतस्थळावर कालबाह्य माहिती आहे.
केवळ पिनकोड व कार्यालयांची माहिती आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग
(www.mahapwd.com)
अधिकर्‍यांची नावे जुनीच.