आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी कपातीचे उद्योजकांकडून स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-महापालिका हद्दीतील उद्योगांना लागणार्‍या कच्च्या मालावर तसेच नवीन मशिनरीवर 2 ऐवजी केवळ 1 टक्का एलबीटी आकारण्याचा प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिल्याचे वृत्त रविवारी ‘दिव्य मराठी’ ने दिले होते. यासंदर्भातील अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध झाली असून उद्योजकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
जळगावातील उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून केवळ 1 एक्का एलबीटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस जिंदाचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, उपाध्यक्ष अमित कोठारी, किरण राणे, रजनीकांत कोठारी, सचिव सचिन चोरडिया, खजिनदार सुनील महाजन, बबलू भोळे, राज्य व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी उपस्थित होते. राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेत 3 फेब्रुवारीपासून सुधारित दर लागू होत असल्याचे म्हटले आहे; मात्र आयुक्तांनी फेरप्रस्ताव दिल्यास डिसेंबर व जानेवारी महिन्याचा लाभही व्यापार्‍यांना मिळू शकतो, असे टावरी यांनी स्पष्ट केले आहे.
व्हॅट लागू करताना दुसरा कुठलाही कर राज्यात राहणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. इतर राज्यात कुठेही दुहेरी करप्रणाली नाही; त्यामुळे पूर्णपणे एलबीटी बाद करावा, अशी आमची मागणी असल्याचे भुवनेश्वर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले. एलबीटी रद्द करण्याचे स्पष्ट आश्वासन देणार्‍या पक्षाच्या बाजूने उद्योजक राहणार आहेत. एलबीटीविरोधात 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचेही सिंग यांनी यावेळी सांगितले.