आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी उद्यानाच्या विहिरीत अनोळखी इसमाची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानातील महानगरपालिकेच्या ६० फूट खोल असलेल्या विहिरीत शुक्रवारी दुपारी अंदाजे ४५ वयाच्या एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली.
शिवाजी उद्यानातील विहिरीत दुपारी काही युवक पोहत होते.
पोहणे झाल्यानंतर ते विहिरीच्या बाजूला उभे होते तर हेमंत महाजन हे टँकरमध्ये पाणी भरत होते. त्या वेळी एक अज्ञात व्यक्ती बऱ्याच वेळेपासून उद्यानातील बाकावर बसलेला होता.
दीड वाजेच्या सुमारास तो व्यक्ती विहिरीच्या काठावर आला. विहिरीत कुणी पोहतोय काय? असा प्रश्न त्याने तेथे उभ्या असलेल्या युवकांना विचारला. त्यानंतर अंगातील शर्ट काढून विहिरीत उडी मारली. तो व्यक्ती पोहण्यासाठी आला असावा? असे युवकांना वाटले. त्यामुळे त्यांनी गांभिर्याने ही गोष्ट घेतली नाही. मात्र, बराच वेळ झाला तरी ती व्यक्ती पाण्यातून बाहेर आली नाही. त्यामुळे एका युवकाने विहिरीत उडी मारून त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाळात फसून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय त्यांना आला. हेमंत महाजन यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात कळवले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक देवरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मनपाचेकर्मचारी उशिरा पोहचले

पाेलिसांनीमहानगरपालिकेच्या गोताखोरांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोलावले. मात्र, एक तास उलटूनही मनपाचे कर्मचारी घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मच्छीमार युवकांची मदत घेतली. त्यांनी मृतदेह शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर वाजेच्या सुमारास मनपा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठा गळ आणून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
सायंकाळी वाजेपर्यंत मच्छीमार युवक, मनपा कर्मचारी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नाही. पोलिसांनी मृत व्यक्तीचा बदामी रंगाचा शर्ट ताब्यात घेतला. परंतु त्यात काहीही आढळले नाही. तर मृत व्यक्ती कोण? याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत हाेऊ शकला नाही.