आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Bengal Youth Committed Suicide Under Railway

प.बंगालच्या तरुणाची रेल्वेखाली अात्महत्या,पाेलिसांना तीन तासांनी पटली अाेळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पश्चिम बंगालमधील एका तरुणाने जळगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीखाली स्वत:ला झोकून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. लोहमार्ग पोलिसांनी तीन तास प्रयत्न केल्यावर तरुणाची ओळख पटली.

रेल्वेस्थानकातील अारएमएस कार्यालयासमाेर पश्चिम बंगालमधील बोराई, जि. हुगळी येथील सपनदास जयदीपदास (वय २७) या तरुणाने अप रेल्वे ट्रॅकवर मालगाडीखाली झाेकून घेऊन अात्महत्या केली. या संदर्भात मालगाडीच्या गार्डने माहिती दिल्यानंतर लाेहमार्ग पाेलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला. लाेहमार्गचे पाेलिस उप िनरीक्षक खलील शेख, राजू निकम यांनी मृताच्या कपड्यांची तपासणी घेतली. त्यात पँटच्या खिशात मिळालेल्या पाकिटात अाधार कार्ड अाणि मतदान कार्डवरून तरुणाची ओळख पटली. पोलिसांनी त्याच्या घरच्यांना माहिती दिली आहे.

तरुण मनोरुग्ण
अात्महत्या केलेला सपनदास हा मुंबई येथील धर्मानंद डायमंड प्रायव्हेट लि . या कंपनीत कामाला हाेता. गेल्या एक वर्षापासून ताे मानसिक अाजाराने त्रस्त असल्याची माहिती त्याचा नातेवाइकांनी दिली. त्याचे कुटुंबीय काेलकाता येथून तीन दिवसांनंतर येणार अाहेत. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत.