आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांनी घेतले पाश्चात्य नृत्याचे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नृत्याकडे केवळ आवड नव्हे तर करियर म्हणूनही पाहता येते. तरुणाईने शरीराच्या सुदृढतेसाठी नृत्याचा वापर केला तर आरोग्यही उत्तम राखता येते, असा सल्ला रायसोनी गृपचे नृत्य दिग्दर्शक चेतन दशमुखे यांनी दिला. जी.एच.रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालयात दोन दिवसीय नृत्य शिबिराचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी पाश्चात्य नृत्याचे धडे घेत नृत्याच्या संकल्पनेचा सुद्धा अभ्यास केला.

किमान एक तास करावे नृत्य
दररोज एक तास तरी दिवसातून नृत्य करावे किंवा संगीत ऐकावे. फक्त आवड म्हणून न करता नृत्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घ्यावा. नृत्याकडे मेडिटेशन म्हणून पाहता येते. नृत्य हे मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांसाठी चांगले असून व्यायामात झुंबा, सालसा यांचे बेसिक प्रकार केले जातात, असे दशमुखे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. नृत्य दिग्दर्शक दशमुखे हे नागपूरचे असून रायसोनी गृपच्या सर्व शाखांच्या 33 महाविद्यालयांमध्ये गेल्या 9 वर्षांपासून ते नृत्याचे धडे देत आहेत. आतापर्यंत अनेक स्टेज परफॉर्मंन्स तसेच 47 स्टार नाइट शो त्यांनी केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सहायक म्हणूनही त्यांनी काही वर्षांपूर्वी काम केले आहे. या प्रशिक्षणासाठी रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या डॉ. प्रीती रायसोनी यांचे सहकार्य मिळत आहे.

‘सालसा’वर थिरकली पावले
दोन दिवसीय प्रशिक्षणात 60 मुलांनी नृत्याचे धडे घेतले. बुधवारी समारोप करण्यात आला. यात पाश्चात्य नृत्य शैलीतील अनेक प्रकार शिकवण्यात आले. यामध्ये बेसिक धडे देण्यात आले. सालसा हा वेगळा नृत्य प्रकार असला तरी तरुणांमध्ये, महिलांमध्ये कपल डान्स करण्यासाठी अधिक प्रचलित आहे. यात सालसा बेसिक, बेसिक कंटेम्प्रररी, बॉलीवूड स्टाइल, फ्री-स्टाइल प्रकार त्यांनी शिकवला. ‘क्योकी तुम ही हो’ हे सध्याचे तरुणाईच्या रिंगटोनचे गाण्यावर कंटेम्प्रररी, ‘कमली’ वर बॉलीवूड तर फ्री-टाइलमध्ये संगीताचा ठेका शिकवण्यात आला. ‘तुम बिन जिया जाए कैसे’, ‘बिन तेरे बिन तेरे’ या गाण्यांवर सालसा नृत्य करण्यात आले.
(फोटो - जी. एच. रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालयात घेण्यात आलेल्या नृत्य शिबिरात प्रशिक्षण घेतांना विद्यार्थिनी.)