आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशाला हवे स्टेट अन् सीबीएसई? देशात एकच परीक्षा मंडळ असावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दहावीनंतर करिअरला वळण देणारे अभ्यासक्रम खूपच कमी आहेत. मात्र, दहावी ही बारावीची तयारी करण्याची पहिली पायरी आहे. बारावीनंतर करिअर विषयक अनेक अभ्यासक्रम असतात. शिवाय अभियांत्रिकी, मेडिकल, व्यवस्थापन आदी शाखांना प्रवेशासाठी परीक्षा असतात. या परीक्षा किंवा इतर विद्याशाखांचा अभ्यासक्रम हा बहुतेकवेळा भिन्न असतो. त्यामुळे कोणती पुस्तके, संदर्भ अभ्यासावेत हे परीक्षार्थींना समजत नाही. जगाच्या ज्ञानाची भाषा इंग्रजी असताना आजही आपण मराठी, सेमी की इंग्रजी यात अडकून पडतो. यापुढे वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या वर्षी सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे स्टेट बोर्डाच्या अभ्याक्रमात शिकलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. मेडिकलमध्ये प्रवेश घेण्यासाठी वर्षभर दिवसरात्र अभ्यास केल्यानंतर अचानक ‘नीट’ परीक्षेचे भूत मानुगटीवर बसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यामुळे स्टेट बोर्ड आणि सीबीएसई असा फरक हवाच कशाला देश पातळीवर एकच परीक्षा मंडळ असणे ही गरज झाली अाहे.

‘सीबीएसई’ अभ्यास प्रात्यक्षिकावर
महाराष्ट्रपरीक्षा मंडळ सीबीएसईच्या अभ्यासक्रमात बरीच तफावत आहे. सीबीएसईचा अभ्यास प्रात्यक्षिकावर आहे. महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यास थिअरीवर आहे. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढलेली असते, ते पात्रता परीक्षेत पुढे असतात. देश पातळीवर एकच परीक्षा मंडळ हवे. राज्यस्तरावर केवळ राज्यभाषा शिक्षणाचे नियोजन व्हावे. त्यामुळे प्रादेशिक भाषा जिवंत राहतील. महाराष्ट्रासह सर्वत्र प्राथमिकस्तरापासून सेमी या माध्यमासाठी CBSE बोर्डाची NCERTची पाठ्यपुस्तके (इंग्रजी, गणित, विज्ञान) दिली, तर आपला विद्यार्थी निश्चितपणे भविष्यातील अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वीपणे उत्तीर्ण करू होऊ शकेल.
अनेक मुलांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच
अनेकपालक आपल्या पाल्यांना प्राथमिकस्तरापासून मराठी (सेमी) माध्यमासाठी प्रवेश देतात. त्यांना आपण महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवतो. पण करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ही सीबीएसई पॅटर्नवर असते. जवळपास सर्व पात्रता किंवा प्रवेश परीक्षा केंद्रीय अभ्यासक्रम मंडळाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित असतात.
सरोज तिवारी| जळगाव
(अतिथीप्रतिनिधी या प्रतापनगरातील अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अाहे)
बातम्या आणखी आहेत...