आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्स अँपच्या माध्यमातून प्रेम; तरुणीची फसवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नातेवाइकांच्या लग्नासाठी एक तरुणी पुण्याहून जळगावला आली होती. परतताना रेल्वे स्थानकाजवळील खासगी रेल्वे बुकिंग करणार्‍या तरुणाला तिने मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर त्यांचे मोबाइलवर बोलणे सुरू झाले. कालांतराने व्हॉट्स अँपद्वारेहीे संपर्क सुरू झाला. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. लग्न करण्यासाठी ती गुरुवारी रात्री जळगावात आली असता, संबंधित तरुण विवाहित असून घटस्फोट घेऊन दुसर्‍या लग्नाच्या तयारीत असल्याचे तिला समजले. शहर पोलिसांनी या तरुणीला आशादीप महिला वसतिगृहात दाखल केले आहे.
पुणे येथील एका प्रतिष्ठित वकिलाकडे काम करणारी आणि मूळची सोलापूर येथील रहिवासी असलेली नूतन (नाव बदलेले) हिचा जळगाव शहरातील शिवाजीनगरात रेल्वे तिकिट बुकिंग करणार्‍या महेबूब मदिन खान (वय 22) याच्याशी तिकिट बुकिंगच्या माध्यमातून संपर्क आला. त्यानंतर अनेक दिवस त्यांचे फोनवरून संभाषण सुरू होते. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले अन् दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नूतनने गुरुवारी जळगाव गाठले. बिग बाजारजवळ ते दोघे भेटले, ही बाब मेहबूबच्या वडिलांना समजली. त्यांनी दोघांना गुरुवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी महेबूबचे पहिल्या पत्‍नीशी घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून घरच्यांनी समाजातील दुसर्‍या एका तरुणीशी त्याच्या विवाहाची बोलणी सुरू केली असल्याचे उघड झाले. नूतनच्या अचानक येण्यामुळे महेबूबचे घरचे धास्तावले आणि त्यांनी तिला समजवण्याचा प्रय} केला. सत्यस्थिती लक्षात आल्यानंतर तिनेही मेहबूबशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. शहर पोलिसांनी नूतनला आशादीप महिला वसतिगृहात रवाना केले आहे.