आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whatsapp News In Marathi, Jalgaon Police Superintendent, Divya Marathi

पोलिस अधीक्षक घेताहेत व्हॉट्स अँपवर आढावा, वेळेची होतोय बचत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतल्यास प्रत्येक क्षेत्रात उपयोगी ठरू शकते. पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांनी ‘व्हॅट्स अँप’चा कामात उपयोग सुरू केला आहे. स्वत: पोलिस अधीक्षक एस.जयकुमार व्हॉटस् अँपच्या माध्यमातून पोलिस दलाच्या अँक्टिव्हिटीवर लक्ष ठेवून आहेत. यावरच ते वर्षभरापासून आढावा घेत आहेत.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जयकुमार हे सर्व अधिकार्‍यांकडून व्हॉटस् अँपवर कायदा व सुव्यवस्थेबाबतची दैनंदिन माहिती मागवत आहेत. त्यामुळे मीटिंगमध्ये वाया जाणारी वेळ भरून काढली जात आहे. या शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्याला जातीय सलोखा निर्माण करण्यासंदर्भात कार्यक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार झालेल्या कार्यक्रमांचे छायाचित्र त्याच दिवशी पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे झालेले कार्यक्रम किती प्रभावी ठरले?, पोलिसांचा सहभाग कसा होता? या गोष्टींकडे पोलिस अधीक्षक थेट लक्ष केंद्रित करीत आहेत.
कामात सुसूत्रता निर्माण झाली
0 पोलिस अधीक्षकांनीच याबाबत सक्ती केली असल्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे सोपे होते.
0 पोलिस कर्मचार्‍यांना दिलेल्या तपासातील प्रगतीवर वेळोवेळी लक्ष ठेवता येते. त्यामुळे तपास अधिकार्‍यांच्या कामात वेग येतो
0 घटना, गुन्हे, अपघातांचे छायाचित्र काही क्षणात पुढे पाठविल्यामुळे संशयितांना ओळखणे सोपे जाते.
0 मीटिंगमध्ये दिल्या जाणार्‍या सूचना संदेशाच्या माध्यमातून पाठवता येतात परिणामी, वेळ वाचतो.
असे होताहेत फायदे
सीसीटीव्हीचे कनेक्शन मोबाइलला
पोलिसांनी शहरातील काही चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या कॅमेरांमध्ये सुरू असलेल्या हालचालही पोलिस अधीक्षक जयकुमार यांच्या मोबाइलमध्ये दिसण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. या कारणामुळे ते कोणत्याही वेळी चौकांमधील सुरक्षा, वाहतूक पोलिसांचे काम यावर लक्ष ठेवून आहेत.
दैनंदिन कामाचाही आढावा
प्रत्येक पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या तपासकामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसभरात काय काम केले. आरोपी अटक केल्यास त्याचे छायाचित्र, मुद्देमाल, संशयितांचे छायाचित्र संबंधित अधिकार्‍यांनी व्हॉटस् अँपवरून पोलिस अधीक्षकांना पुरवणे सक्तीचे करण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यांमधील गुन्हे तपासातील प्रगती, कर्मचार्‍यांनी दिवसभर केलेल्या कामाचा आढावा दररोज तपासण्यासाठी व्हॉटस् अँपवर माहिती पाठवण्याची सक्ती केली आहे. यामुळे सर्वांच्याच कामात सुसूत्रता निर्माण झाली आहे. एस.जयकुमार, पोलिस अधीक्षक.