आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: कुटुंबीय घरातच झाेपलेले असताना चाेरट्यांनी लांबवला53 हजारांचा ऐवज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: पिंप्राळापरिसरातील सेंट्रल बँक काॅलनीतून चाेरट्यांनी साेमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे ५.३० वाजेदरम्यान कुटुंबीय झाेपलेले असताना घरात घुसून ५३ हजारांचा एेवज लंपास केला. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
सेंट्रल बँक काॅलनीतील गट नं. १९०/४चा प्लाॅट क्रमांक १४ हा भगवान मराठे यांच्या मालकीचा अाहे. त्यांच्या घरात वरच्या मजल्यावर रावसाहेब जयराम खाेंडे हे भाड्याने राहतात.
 
त्यांच्यासाेबत वडील जयराम खाेंडे पत्नी कविता या राहतात. दाेन दिवसांपूर्वी कविता यांच्याकडे त्यांच्या वहिनी साेनाली दीपक अहिरराव या अालेल्या हाेत्या. तापमान वाढलेले असल्याने ते रात्री झाेपताना घराचा दरवाजा उघडाच ठेवतात. साेमवारी जयराम खाेंडे यांनी कामासाठी बँकेतून हजार रुपये काढून अाणले हाेते. त्यामुळे ते त्यांनी पॅन्टच्या खिशात ठेवलेले हाेते. साेमवारी रात्री १२.३० वाजता खाेंडे कुटुंबीय झाेपले. पहाटे ५.३० वाजता नेहमीप्रमाणे कविता खाेंडे या उठल्या. त्यांनी वेळ बघण्यासाठी खिडकीजवळ ठेवलेला माेबाइल शाेधला. मात्र, त्यांचा माेबाइल सापडला नाही. त्यानंतर त्यांनी लाइट लावून बघितले तर माेबाइल, पर्स अाणि जयराम यांची पॅन्ट गायब हाेती. 
 
चोरीत तीन मोबाइल, रोख रक्कम, दागिन्यांचा समावेश 
कवितायांना घरात चाेरी झाल्याचे लक्षात अाल्यानंतर त्यांनी पती अाणि वहिनीला झाेपेतून उठविले. त्यांना घटनेची माहिती दिली. चाेरट्यांनी घरातून १३ हजार रुपये किमतीचे तीन माेबाइल, जयराम यांच्या पॅन्टमधील हजार रुपये, कविता यांच्या पर्समधील अडीच हजार रुपये, साेनाली अहिरराव यांच्या पर्समधील त्यांच्या मुलाचे ताेळे साेन्याचे अाणि भार चांदीचे दागिने असा एकूण ५३ हजारांचा एेवज लंपास केला अाहे. चाेरटे पर्स अाणि पॅन्ट बाजूच्या घराच्या गच्चीवर असलेल्या पाण्याच्या दाेन टाक्यांच्या मध्ये फेकून पसार झाले. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...