आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाच्या सांगण्यावरून अशाेक सादरेंचा काॅल रेकाॅर्ड केला? सादरे अात्महत्या प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/नाशिक- खंडणीचा गुन्हा दाखल हाेऊ नये, म्हणून सागर चाैधरीची समजूत काढण्यासाठी पाेलिस निरीक्षक अशाेक सादरे यांनी तुम्हाला काॅल केला हाेता. ताे काॅल तुम्ही काेणाच्या सांगण्यावरून रेकाॅर्ड केला, असा प्रश्न सीअायडीच्या पथकाने मनसे नगरसेवक ललित काेल्हे यांना बुधवारी चाैकशीदरम्यान केला.
या वेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पथकाला सांगितला. त्यानंतर चाैघा वाळू ठेकेदारांची पुन्हा चाैकशी करण्यात अाली. दरम्यान, तपासी पथकाचे अधिकारी शुक्रवारी जळगावात येणार असून ते या दाेन्ही गुन्ह्यांशी संबंधितांची चाैकशी करणार अाहे.
सादरे अात्महत्याप्रकरणी गेल्या अाठवड्यापासूनच तपासाला गती अाली अाहे. सीअायडी पथकाकडून सादरे यांना अात्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाच्या गुन्ह्याचा अाणि सादरे यांच्याविराेधात जळगावातील खंडणीच्या गुन्ह्याचा, असा दुहेरी तपास एकाचवेळी सुरू अाहे. या प्रकरणात पथकाने अातापर्यंत संशयित वाळू ठेकेदार सागर चाैधरीशी संबंधित असलेल्या सादरे यांच्याविराेधात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादी रवींद्र चाैधरी अाणखी एक ठेकेदार राजेंद्र मिश्रा, मनसेचे नगरसेवक ललित काेल्हे यांना चाैकशीसाठी समन्स बजावले हाेते.
त्यानुसार या तिघांची सीअायडीचे अधीक्षक प्रदीप देशपांडे, उपअधीक्षक के.डी.पाटील यांनी सलग चार ते पाच तासांची स्वतंत्रपणे चाैकशी केली. २० नाेव्हेंबर राेजी तपासी पथक जळगावात येणार अाहे. या वेळी हे पथक सादरे यांनी कर्तव्य बजावलेल्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह त्यांचे निकटचे संबंध असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून पुरावे गोळा करणार आहेत.

ललित काेल्हेंची तास चौकशी
बुधवारीकाेल्हे यांची तास चाैकशी करण्यात आली. त्यात सादरे यांच्याविरोधात सागर चौधरी ज्यावेळी खंडणीचा गुन्हा दाखल करीत होता. त्या वेळी सादरे यांनी कोल्हे यांना फोन करून चौधरीस समजावण्यास सांगितले होते. अापण पहिल्यांदाच तुम्हाला काम सांगत असून तुमचे अायुष्यभर उपकार विसरणार नाही, त्याला थांबवा, अशी विनंती केली हाेती. हे फाेनवरील संभाषण काेल्हे यांनी रेकाॅर्ड करून तेच न्यायालयात सादर करण्यात अाले हाेते. यावर हे रेकॉर्डिंग नेमके काेणाच्या सांगण्यावरून केले, त्याचा नेमका काय वापर केला? यासह विविध प्रश्न उपस्थित करण्यात अाले.
सुमारे तीन तास चाललेल्या चाैकशीत काेल्हे यांनी संपूर्ण घटनाक्रम विषद केल्याचे त्यांचे अाणि सादरे यांचे संबंध तसेच सागर चाैधरी हा काॅलेजपासून मित्र असला तरी कालांतराने व्यवसाय अाणि राजकीय कारणास्तव दुरावा निर्माण झाल्याचे त्यांनी जबाबात म्हटले अाहे. याचवेळी मिश्रा यांची पुन्हा चाैकशी करण्यात अल्याचे सूत्रांनी सांगितले.