आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर मंडप टाकण्यास बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातलग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रमांसाठी रस्त्यावर मंडप टाकताना यापुढे वाहतूक पाेलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र अाणि महापालिका अायुक्तांकडून परवानगी घ्यावी लागणार अाहे. तसेच शहरात १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर मंडप टाकण्यास बंदी घालण्यात अाली अाहे.
नागरिकांनी ध्वनिप्रदूषणासंदर्भात महापालिका, पाेलिस अथवा महसूल विभागाकडे तक्रार केल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाणार असून त्यासाठी पाेलिस, महापालिका अाणि महसूल या विभागांची स्वतंत्र तीन पथके तयार करण्यात अाल्याची माहिती अायुक्त संजय कापडणीस यांनी दिली.

उच्च न्यायालयात दाखल करण्यात अालेल्या एका जनहित याचिकेवर िनर्णय देताना न्यायालयाने महापालिका क्षेत्रासाठी विशेष सूचना दिल्या अाहेत. राज्य शासनाने यासंदर्भात अादेश काढले असून याचा जळगाव महापालिकेने अंमलबजावणीचा अाराखडा तयार केला अाहे. ध्वनिप्रदूषण अाणि रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या मंडपावर वेगवेगळ्या कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती अायुक्त कापडणीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अायाेजित पत्रकार परिषदेत दिली.

तक्रारीसाठी टोलफ्री क्रमांक
शहरातध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची नागरिक महापालिकेकडे तक्रार करू शकतात. यासाठी १८००२३३५२४७ या टाेल फ्री क्रमांकासह ९४०३६८६२३५ या क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार करू शकतील. त्याशिवाय १०० या क्रमांकावरदेखील तक्रार करता येईल. तसेच jcmcjalgaon@gmail.com या ई-मेलवरदेखील नागरिकांना तक्रार करता येणार आहे. महापालिकेचे स्वतंत्र पथक तत्काळ या तक्रारीची दखल घेईल. त्याशिवाय तहसीलदारांच्या नेतृत्वातील स्थापन केलेले पथकही कारवाई करेल.

२५ टक्केच जागा मंडपासाठी
शहरातयापुढे १२ मीटरपेक्षा अधिक रुंद असलेल्या रस्त्यावरच मंडप टाकण्याची परवानगी मिळेल. त्यासाठी जागेचा स्थळदर्शक नकाशा, वाहतूक पाेलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहनतळाची व्यवस्था, ध्वनिप्रदूषण नियंत्रणात असल्याचे प्रतिज्ञापत्र अावश्यक अाहे. कार्यक्रम मंडळाचा असल्यास त्यासाठी मंडळाचे धर्मदाय अायुक्तांकडून मिळालेले नाेंदणी प्रमाणपत्र, मंडळाच्या कार्यकारिणीचे नाव, पत्ता आदींची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच १२ मीटर रुंदी असलेल्या रस्त्यावर केवळ २५ टक्केच जागा मंडपासाठी देता येईल. चाैक, टी जंक्शनवर परवानगी मिळणार नसल्याचे अायुक्त कापडणीस यांनी सांगितले. तसेच धार्मिक संस्थांकडून फी घेण्यासंदर्भात स्थायी समितीने ठराव केल्याने सध्या फी घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातठिकाणी शांतता झाेन
जळगावशहरात सात ठिकाणी शांतता झाेन निश्चित करण्यात अाले अाहेत. त्यात सामान्य रुग्णालयाचा परिसर, रुग्णालयासमाेरील पांडे चाैक ते अप्पा महाराज समाधीपर्यंतचा रस्ता तसेच दक्षिणेकडील बाजूचा संपूर्ण रस्ता शांतता झाेनमध्ये असेल. ला.ना.विद्यालय, अार.अार.विद्यालय अाणि सागर हायस्कूलपर्यंतचा संपूर्ण परिसर, स्टेट बँक ते सागर हायस्कूलचा रस्ता, स्टेट बँक ते न्यायालयापर्यंतचा रस्ता, माॅडर्न विद्यालय ते इंडाे अमेरिकन रुग्णालयापर्यंतचा रस्ता, न्यायालयाचा परिसर, न्यायालय ते छत्रपत्री शाहू महाराज रुग्णालयापर्यंतचा रस्ता. तसेच न्यायालयाच्या तिन्ही बाजूंचे रस्ते, भास्कर मार्केटभाेवतीच्या रुग्णालयांचा परिसर. बहिणाबाई उद्यानासमाेरील रस्ता, स्वातंत्र्य चाैकापर्यंतचा रस्ता, एम.जे. काॅलेज भाेवतीचा १०० मीटरचा परिसर, अाय.एम.अार महाविद्यालय ते बाहेती महाविद्यालय क्षेत्रातील चारही बाजूचे रस्ते. शहरातील रहिवासी भाग, मंगल कार्यालयाभाेवतीचा परिसराचा समावेश आहे.