आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहुण्याची मदत घेऊन काढला पतीचा काटा, सतत मारहाण करणाऱ्या पतीला पत्नीनेच संपवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला पत्नीनेच मेहुण्याच्या मदतीने संपवल्याची कुऱ्हे (पानाचे) येथे बुधवारी घडली. रमेश कनीराम राठाेड (वय ३५, रा. महादेव तांडा, मूळगाव गाेदरीतांडा, ता. जामनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव अाहे. मृताची पत्नी तिच्या मेहुण्यास अटक झाली आहे.
 
तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील महाराष्ट्र ढाब्याजवळील माेरीजवळ रमेश राठाेड यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी आढळला. याप्रकरणी साईराम जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. शविवच्छेदनाच्या अहवालावरून राठाेडचा खून झाल्याचे समोर आले. खूनप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत पाटील, उपनिरीक्षक सचिन खामगड, उपनिरीक्षक सुरेश वैद्य, हवालदार हर्षवर्धन सपकाळे, युनूस शेख, सुधाकर पाटील, तुषार पाटील, अशेाक गंगावणे यांनी महादेव तांडा गाठून संशयावरून मृताची पत्नी सुशीलाबाई राठाेड माेतीलाल अभयसिंग राठाेड यांना ताब्यात घेतले. पाेलिस ठाण्यात अाणून त्यांची कसून चाैकशी केल्यावर दोघांनी खुनाची कबुली दिली. धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे संशयितांनी कबूल केले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
 
दोन दिवसात दुसरी घटना : शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वार झाल्यामुळे रमेशचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले अाहे. सोमवारीच साकेगाव येथे एका मजूराचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोनच दिवसात पुन्हा खुनाची घटना घडली. तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिस प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे उपाय आवश्यक आहेत.
 
आज न्यायालयात हजेरी
कुऱ्हाप्रकरणातील दाेन्ही संशयितांना तालुका पाेलिस शुक्रवारी न्यायालयात हजर करणार अाहेत. गुन्ह्यातील इतरांचा सहभाग, खून करताना वापरलेले हत्यार याची माहिती काढण्यासाठी पाेलिसांतर्फे पाेलिस काेठडी मागितली जाणार अाहे. पाेलिस उपनिरीक्षक सचिन खामगड या प्रकरणाचा पुढील तपास करत अाहेत.
 
बातम्या आणखी आहेत...