आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज, मोक्याच्या ठिकाणी शहरवासीयांसाठी वाय-फाय सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बीएसएनएलतर्फे कॉलेज, मोक्याच्या सहा ठिकाणी मोबाइलधारकांना सशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव बीएसएनएलने वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात अाला आहे. मोबाइलधारकांना वाय-फाय सुविधा वापरण्यासाठी रिचार्जद्वारे शुल्क आकारले जाणार अाहे. पुढील महिन्यात ही सुविधा सुरू होणार असल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइलवर इंटरनेटचा वापर करता यावा, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने आवारात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे गरजू विद्यार्थी या सुविधेचा वापर करून शैक्षणिक माहिती मिळवत असतात. त्याअनुषगाने बीएसएनएल कंपनीने सशुल्क ही सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील गर्दीची ठिकाणे निश्चित करून तेथील १०० मीटर परिसरात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

भोरस हातेडला वाय-फाय सुविधा : खासदारए. टी. पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील भोरस खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा तालुक्यातील हातेड हे गाव दत्तक घेतले आहे. हे गाव या याेजनेंतर्गत शैक्षणिकदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहे. यासाठी या दाेन्ही गावांत शासनातर्फे वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे.

यासंबंधीचे पत्र शासनाकडून बीएसएनएलचा प्राप्त झाले आहे. मात्र, ही सुविधा गावात सुरू करण्याविषयी दोन्ही खासदारांचे पत्र अद्याप बीएसएनएलला प्राप्त झालेले नाही. खासदारांचे पत्र प्राप्त होताच या दाेन्ही गावांतही वाय-फायची सुविधा पुरवली जाणार असल्याची माहिती बीएसएनएलने दिली.

येथे ‘वाय-फाय’ सुविधा
एमअायडीसीमधील बीएसएनएल कार्यालय परिसर, शिवाजीनगर, मू.जे. महाविद्यालय, मायादेवीनगर, फुले मार्केट परिसर, रामानंदनगरसह जिल्ह्यातील चाळीसगाव भुसावळ येथील बीएसएनएलचे कस्टमर केअर सेंटर येथे वाय-फाय मशीन लावण्यात येणार आहे.

अशी मिळेल सुविधा
वाय-फायसुविधेचा वापर करण्यासाठी बीएसएनएलच्या ग्राहकांना मोबाइलवर नेटचा रिचार्ज विकत घ्यावा लागेल. त्यानंतर कंपनीकडून ग्राहकाला पासवर्ड दिला जाईल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाला आपल्या मोबाइलवर वाय-फाय सुविधेचा वापर करता येणार आहे. ही ‘टू-जी’ ‘थ्री-जी’ची सुविधा असणार अाहे. वाय-फाय क्षेत्र निश्चित केलेल्या १०० मीटरच्या परिसरात रिचार्ज केलेल्या ग्राहकाला या सुविधेचा लाभ घेता येईल.