आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ पालिकेतील विजयाचे श्रेय आमदार संजय सावकारेंना, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री एकनाथ खडसे, सोबत मान्यवर. - Divya Marathi
कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री एकनाथ खडसे, सोबत मान्यवर.
भुसावळ - पालिकानिवडणुकीची सूत्रे आमदार संजय सावकारे यांनी सांभाळली. त्यामुळे पालिका निवडणुकीतील विजयाचे श्रेय आमदार संजय सवकारे यांच्यासह सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
बियाणी स्कूलमध्ये रविवारी रात्री नवनिर्वाचित नगराध्यक्ष रमण भाेळे यांच्यासह नगरसेवकांचा गौरव अाणि अामदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. राजकीय जीवनात चढ-उतारांचा अनुभव घेतला आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठे करताना मागचा किंवा पुढचा विचार केला नाही. मात्र, आज अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजकारणात असूनही दुरावले आहेत. असे खडसे यांनी सांगितले. पालिकेत सत्ता अाल्यामुळे कामाची जबाबदारी वाढली अाहे. त्यामुळे जनतेला दिलेली अाश्वासने पूर्ण करा. काेण काय बाेलले हे विसरा, त्यांना लाेकांनी इतिहासात जमा केले अाहे. नागरिकांच्या तक्रारी सोडवा, सर्वच कामे अाता अाॅनलाइन करा, असे आवाहन खडसे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना केल्या. कार्यक्रमात आमदार सावकारे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मनाेज बियाणी, नगराध्यक्ष रमण भाेळे, प्रा. सुनील नेवे, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र चौधरी, पाराेळ्याचे नगराध्यक्ष करण पवार उपस्थित होते.

एेनवेळी सुरीगायब : अामदारसावकारे यांच्या हस्ते केक कापला जाणार हाेता. त्यावेळी सुरी गायब झाली. लहान कटरने केक कापण्यात अाला. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी भलामोठा हार घालून खडसे यांच्यासह आमदार सावकारे यांचा सपत्नीक गौरव केला.

{सर्वसमावेशक विकास: वाढदिवसाचेबॅनर्स लावून शहराचे विद्रूपीकरण अावडत नाही. निवडणुकीत मतदारांनी विश्वास दाखवून बहुमत दिले. भाजपचे काही उमेदवार पराभूत झाले, मात्र त्यांच्यासह सर्वच वॉर्डांमध्ये कामे होतील, अशी ग्वाही सावकारे यांनी दिली.

निवडून आणण्याचा शब्द
विधानसभा निवडणुकीपूर्वी मी सावकारे यांना निवडून आणण्याचे आश्वासन दिले होते. कोणत्याही पक्षाकडून सावकारे यांनी निवडणूक लढवल्यास त्यांना विजयी करण्याचा मी शद्ब दिला होता. मात्र, तेव्हा युती तुटलेली नव्हती. तसेच भुसावळची अामदारपदाची जागा शिवसेनेची हाेती. तरीदेखील सावकारे यांनी मंत्रीपदाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपची जागा नसताना त्यांनी पक्ष साेडला, असे कार्यकर्ते मोजके असतात, पालकमंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी छाप पाडली आहे, अशा शद्बात खडसे यांनी आमदार सावकारे यांचा गौरव केला.
बातम्या आणखी आहेत...