आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील थंडी झाली गायब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहराचे किमान तापमान 9.5 अंशांपर्यंत खाली आले होते. सध्या मात्र, किमान तापमानाचा पारा 13 ते 15 अंशांच्या दरम्यान आहे. यासह 28 अंशांवर स्थिरावलेले कमाल तापमान आता थेट 31 अंशांवर पोहोचल्याने थंडी गायब झाली आहे.

रब्बीच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानावर परिणाम झाला होता. डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात किमान तापमान 11 अंशांच्या वरच स्थिरावले. यासह कमाल तापमानही 30 ते 31 अंशांच्या दरम्यान असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले.

गेल्या तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थंडीचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी 8 आणि 9 जानेवारी रोजी तापमानाचा पारा 9 अंशांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातून वर्तवण्यात आलेला आहे.