आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहराचे तापमान 10 अंशावर; थंडीचा कडाका कायम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नववर्षात सुरू झालेला थंडीचा कडाका कायम आहे. गेल्या आठवड्यात 6.6 अंशापर्यंत आलेला तापमानाचा पारा रविवारी 10.1 अंशावर आला होता. तापमानात काहीही वाढ झाली नसली तरी थंडीचा कडाका मात्र कायम होता.
रविवारी राज्यात सर्वाधिक कमी तापमान अहमदनगर येथे 5.3 अंश सेल्सिअस होते. उत्तरेतील थंडीच्या लाटेचा उत्तर महाराष्ट्रात असलेला प्रभाव गेल्या पंधरा दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे पहाटे 4 वाजता वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा असतो. हा गारठा सकाळी 9 वाजेपर्यंत कायम असतो. त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत त्याची तीव्रता कमी प्रमाणात जाणवत असते. वाढलेल्या गारठ्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत असून शाळेच्या वेळा बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण त्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, पुणे हवामान विभागातर्फे थंडीची लाट सध्यातरी कायम राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.